गेल्या १० वर्षांत भारताने जिंकले एकच आयसीसी अजिंक्यपद

सलग नऊ टुर्नामेंटमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे.

गेल्या १० वर्षांत भारताने जिंकले एकच आयसीसी अजिंक्यपद

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये भारताचा दारुण पराभव झाला. त्यामुळे सलग दुसऱ्यांदा किताब जिंकण्याचे भारताचे स्वप्न धुळीस मिळाले. लंडनच्या ओव्हर मैदानावर रंगलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा २०९ धावांनी पराभव केला. भारतीय संघ गेली १० वर्षे आयसीसीचा किताब जिंकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याला विजयाने सतत हुलकावणी दिली आहे.

गेल्या १० वर्षांत आयसीसीच्या १० पैकी केवळ एक टुर्नामेंट भारत जिंकू शकला. तर, सलग नऊ टुर्नामेंटमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. कधी भारतीय संघ उपांत्य सामन्यात पराभूत होतो, तर कधी अंतिम सामन्यात. यावेळी भारतीय संघ सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात पोहोचला होता. त्यामुळे यंदा भारतीय संघ बाजी मारेल, असेच वाटत होते. मात्र भारतीय संघाने निराशा केली.

हे ही वाचा:

रॅम्प वॉक करताना लोखंडी खांब कोसळला; २४ वर्षीय मॉडेलचा मृत्यू

सर्वाधिक विजेतीपदे जिंकणाऱ्या कोरियाला नमवले; भारताच्या ज्युनियर महिला अजिंक्य

दोन वर्षात १५० हून अधिक वेब साईट्स, युट्युब चॅनेल्सवर बंदी

‘संस्कारी, देशप्रेमी, सुदृढ बाळ हवंय, मग रामायण वाचा’

शेवटचा किताब सन २०१३मध्ये जिंकला होता

भारतीय क्रिकेट संघाने शेवटचा किताब २०१३मध्ये जिंकला होता. तेव्हा महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चॅम्पियन कप जिंकला होता. तेव्हा बर्मिंगहममध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघाने पाच धावांनी चॅम्पियन्स कप जिंकला होता. या चॅम्पियन्स कपनंतर भारतीय संघाने आतापर्यंत नऊ आयसीसी टुर्नामेंट खेळल्या आहेत. या सर्व टुर्नामेंटमध्ये भारतीय संघ चारवेळा अंतिम तर, चार वेळा उपांत्य फेरीपर्यंत पोहोचला आहे. तर, सन २०२१मध्ये झालेल्या टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ साखळीतूनच बाहेर पडला होता.

गेल्या १० वर्षांतील भारताची परिस्थिती

२०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी- अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत केले २०१४ टी २० वर्ल्ड कप- अंतिम सामन्यात श्रीलंकेकडून पराभव २०१५ वनडे वर्ल्ड कप- उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव २०१६ टी२० वर्ल्ड कप- उपांत्य सामन्यात वेस्ट इंडिजकडून पराभूत २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी – अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभव २०१९ वनडे वर्ल्ड कप- उपांत्य सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव २०२१ टेस्ट चॅम्पियनशिप – अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून पराभव २०२१ टी २० वर्ल्ड कप- गटसाखळीतूनच बाहेर पडण्याची नामुष्की २०२२ टी २० वर्ल्ड कप – उपांत्य सामन्यात इंग्लंडकडून पराभव २०२३ टेस्ट चॅम्पियनशिप – अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभूत

Exit mobile version