भारताचे विक्रमी लसीकरण! एका दिवसात एक करोड

भारताचे विक्रमी लसीकरण! एका दिवसात एक करोड

कोविडच्या जागतीक महामारीच्या विरोधात लसीकरण हे एकमेव अस्त्र आहे. भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेत भारताने एका नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. भारताने एका दिवसात एक करोड पेक्षा जास्त नागरिकांना लसीचे डोस दिले आहेत. हा एक विश्वविक्रम ठरला आहे.

शुक्रवार २७ ऑगस्ट रोजी भारताने हा नवा विक्रमी पल्ला गाठला. यामुळे भारतात आजवर दिल्या गेलेल्या एकूण डोसची संख्या ६२ कोटींच्या वर गेली आहे. या आधी भारताने १६ ऑगस्ट रोजी विक्रमी लसीकरणाची नोंद केली होती. तेव्हा एका दिवसात ९२ लाख लसींचे डोस देण्यात आले होते.

हे ही वाचा:

नारायण राणेच्या नादी लागू नका…नाही तर मला सगळेच बोलावे लागेल

अखेर राष्ट्रवादीला दिसले रस्त्यावरील खड्डे

…म्हणून सध्या चवदार तळे आहे चर्चेत

‘कोळी समाजाला हद्दपार करण्याचे शिवसेनेचे कारस्थान’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरच्या माध्यमातून या विक्रमी लसीकरणाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी या मोहिमेत सहभाग नोंदवणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे. ‘आजच्या दिवशी विक्रमी लसीकरणाची नोंद झाली आहे. १ कोटी लसींचा विक्रम ओलांडणे हा एक महत्त्वाचा पराक्रम आहे. लसीकरण करणाऱ्या नागरिकांचे आणि लसीकरण मोहीम यशस्वी करणाऱ्या सर्वांचेच अभिनंदन.’

तर केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनीदेखील या विक्रमा बद्दल सर्वांचे कौतुक केले आहे आपल्या ट्विटमध्ये म्हणतात ‘सर्वांचे समर्थन, सर्वांसाठी विकास, सर्वांचा विश्वास, सर्वांचे प्रयत्न
हेच ते प्रयत्न आहेत ज्याद्वारे देशाने १ दिवसात १ कोटीहून अधिक लसी देण्याचा आकडा पार केला आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांची अथक मेहनत आणि #SabkoVaccineMuftVaccine हा पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा निर्धार फळाला येत आहे.

Exit mobile version