भारत-चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक!

सीमेवरील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने दोन्ही देशांची चर्चा

भारत-चीन यांच्यात कॉर्प्स कमांडर स्तरावर बैठक!

तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लष्करी अडथळ्याचे निराकरण करण्यासाठी, भारत आणि चीनमध्ये सोमवारी (१४ ऑगस्ट) कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची १९ वी फेरी होणार आहे.या अगोदरही दोन्ही देशांमध्ये बैठका झाल्याअसून अनेक मुद्द्यांवर सहमती झाल्या आहेत, मात्र काही मुद्दे अजूनही प्रलंबित आहेत.वृत्तानुसार, पूर्व लडाख सेक्टरमधील चुशुल-मोल्डो पॉईंटवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

एएनआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील (एलओसी) स्थिती आक्रमकपणे बदलण्याचा प्रयत्न केल्याने मे २०२० पासून गेल्या तीन वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये लष्करी तणाव निर्माण झाला आहे.या संदर्भांत दोन्ही देशांमध्ये उद्या उच्च-स्तरीय लष्करी चर्चा होणार आहे.दोन्ही देशांमधील कॉर्प्स कमांडर स्तरावरील होणारी बैठकाची ही एकोणिसावी फेरी असणार आहे.मिळालेल्या माहितीनुसार पूर्व-लडाख सेक्टरमधील चुशुल-मोल्डो भागाबाबत चर्चा होणार असल्याची माहिती आहे.

हे ही वाचा:

भारतीय हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या विजेतेपदावर चौथ्यांदा कोरले नाव

राज्यात ह्युंदाई कंपनी चार हजार कोटींची गुंतवणूक करणार

‘मणिपूर हिंसाचारावर लष्कर हा तोडगा नाही’

त्र्यंबकेश्वराचे व्हीआयपी दर्शन बंद!

१४ ऑगस्ट रोजी चिनी सैन्याच्या प्रतिनिधींसोबत होणाऱ्या चर्चेसाठी भारताकडून फायर अँड फ्युरी कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल रशीम बाली हे भारताचे नेतृत्व करणार आहेत.तसेच परराष्ट्र मंत्रालय आणि आयटीबीपीचे अधिकारी देखील चर्चेचा भाग असतील अशी अपेक्षा आहे. DBO आणि CNN जंक्शनशी संबंधित मुद्द्यांसह इतर बाबींवर चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत देखील पूर्व लडाख आघाडीपासून मुक्त होण्यासाठी दबाव आणेल, ” असे संरक्षण सूत्रांनी एएनआयला सांगितले.तब्बल चार महिन्यांच्या कालावधीनंतर ही बैठक होत आहे. कोर कमांडर स्तरावर दोन्ही बाजूंमधील शेवटची बैठक या वर्षाच्या सुरुवातीला एप्रिलमध्ये झाली होती. दोन्ही बाजू आपापल्या स्थिती मजबूत करण्यासाठी सीमावर्ती भागात वेगाने बांधकाम करत असताना ही बैठक होत आहे.

दरम्यान, एप्रिल महिन्यात पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील कॉर्प्स कमांडर स्तरावरील चर्चेची अठरावी फेरी झाली. त्या बैठकीत भारताचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल रशीम बाली यांनी केले होते . त्याच दर्जाच्या एका चिनी अधिकाऱ्याने चीनची बाजू मांडली होती. चर्चेमुळे अनेक भागात सैन्याची तैनाती कमी झाली असून लष्करी बफर झोन तयार झाले आहेत. २०२० मध्ये गलवानमध्ये भारतीय सैनिक आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये तणाव वाढला आहे. दोन्ही देशांचे सैन्य सीमेवर आहेत. चीन सतत आपल्या बाजूने लष्करी पायाभूत सुविधांचा विकास करत आहे, तर भारताच्या बाजूनेही त्याला वेग आला आहे.

Exit mobile version