भारताचा चिन्यांना पुन्हा दणका

भारताचा चिन्यांना पुन्हा दणका

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये सिक्कीम मधील नाकुला सीमेवर पुन्हा एकदा झटापट झाली. या झटापटीत चीनचे २० तर भारतीय सैन्याचे ४ जवान जखमी झाले आहेत.

भारत-चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर मे २०२० पासून तणावाचे वातावरण आहे. मे २०२० मध्ये गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक आणि क्रूर झडप झाली. यामध्ये भारत आणि चीनचे अनेक सैनिक मृत्यमुखी पडले होते. सुमारे चार दशकानंतर या दोन देशांमधील सैनिकांना प्राण गमवावे लागले होते. चीनने घुसखुरी करून भारतीय हद्दीत तंबू ठोकल्यामुळे गलवान खोऱ्यात हिंसा झाली होती.

१९७९ मध्ये नाकूला सीमेवरच भारत आणि चीन दरम्यान झालेल्या चकमकीत अनेक चिनी सैनिकांना प्राण गमवावा लागला होता. त्या झटक्यानंतर अनेक वर्ष चीन भारताच्या वाटेल गेला नाही. थेट २०२० मध्ये पहिल्यांदाच या दोन देशातील सैनिक मृत्युमुखी पडले. आणि आता पुन्हा नाकूलामध्येच झटापट झाली आहे.

या झटापटीतील पूर्ण तपशील अजून जाहीर करण्यात आला नसला तरी वीस चिनी सैनिक तर चार भारतीय सैनिक या झटापटीत निश्चितपणे गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

Exit mobile version