…म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन

…म्हणून साजरा केला जातो राष्ट्रीय बालिका दिन

प्रति वर्षी २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मुलींचे हक्क, त्यांचे शिक्षण, आरोग्य या सगळ्या बाबत जनजागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवले जातात.

त्यासोबतच समाजातील मुलींचे स्थान वाढविण्याच्या दृष्टीने आणि त्यांचे आयुष्य सुकर करण्याच्या दृष्टीने जनजागृती केली जाते. महिला आणि बालकल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय बालिका दिन सुरू करण्यात आला असून २००८ झाली पहिल्यांदा हा दिवस साजरा केला गेला.

हे ही वाचा:

‘मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त थयथयाट’

तस्लिमा यांनी सरोगेसीच्या मुलांना ‘रेडीमेड बेबी’ का असे संबोधले ?

‘ठाकरे सरकारच्या राज्यात मुघल कबरीतून पुन्हा अवतरलेत’

‘२५ वर्षे युतीत सडले म्हणजे बाळासाहेबांनी शिवसेनेला सडत ठेवले का?’

गेल्या काही वर्षापासून सरकार मार्फत बालिकांसाठी अनेक विशेष योजना राबविल्या जात आहेत. ज्यामध्ये मुलींसाठी मोफत शिक्षण, सीबीएससी उडान योजना, महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये महिलांसाठी आरक्षण, बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना अशा विविध योजना राबवून मुलींच्या आयुष्यात दूरगामी परिणाम साधण्याचा प्रयत्न सरकारी पातळीवर होत आहे.

या दिनाचे औचित्य साधून भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालय तर्फे उमंग हा रांगोळी उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात, सहभागी संघ महिला स्वातंत्र्यसैनिकांचे  किंवा देशातील आदर्श महिलेचे नाव दिलेल्या रस्ते मार्गावर आणि चौकांवर सुमारे एक किलोमीटर लांबीची रांगोळी काढून सजावट करतील. देशभरात 50 हून अधिक ठिकाणी अशाप्रकारची रांगोळी काढली जाणार आहे. ‘बालिका दिन’ आणि ‘आझादी का अमृत महोत्सव’ अशाप्रकारे या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरा करण्याची ही एक उत्तम पर्वणी आहे.

Exit mobile version