भारत आणि कॅनडादरम्यान सुरू असलेल्या राजनैतिक वादाच्या पार्श्वभूमीवर पाश्चिमात्य प्रसारमाध्यमांत सुरू असलेल्या वृत्तांकनावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी टीका केली आहे. ‘पाश्चिमात्य माध्यमांकडून नियमितपणे घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांवर मला कधीच आश्चर्य वाटले नाही. दुसऱ्या देशांबाबत बोलायची वेळ आल्यास तातडीची प्रतिक्रिया दिली जाते, मात्र स्वत:च्या देशाबाबत असे काही घडल्यास डोळे झाकून घेतले जातात.
बीबीसीने वृत्तात काय म्हटले आहे पहा, पाश्चिमात्य देशांनी रशिया किंवा इराण किंवा सौदी अरेबिया सारख्या देशांद्वारे दुसऱ्या देशांमध्ये केल्या गेलेल्या कथित हत्यांबाबत टीका केली आहे. भारत या यादीत समाविष्ट व्हावा, अशी त्यांची इच्छा नाही’,’ असे शशी थरूर यांनी ‘एक्स’वर एक लिंक शेअर करून नमूद केले आहे.
हे ही वाचा:
अहमदनगरमध्ये तिहेरी हत्याकांड; जावयाकडून पत्नी, मेव्हणा, आजे सासूची हत्या
शर्टाचे बटण उघडे ठेवल्यामुळे गुन्हा !
सुप्रिया सुळेंना नको आहे महिला आरक्षणाचा लाभ
आता खिचडी घोटाळ्यात गजानन कीर्तिकरांच्या मुलाचे नाव !
‘गेल्या २५ वर्षांत इस्रायल आणि अमेरिकेने दुसऱ्या देशांमध्ये सर्वाधिक हत्या केल्या. पाश्चिमात्य माध्यमे याकडे डोळे उघडून पाहतील का?’, असा प्रश्न थरूर यांनी उपस्थित केला आहे. याआधी शशी थरूर यांनी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर केलेल्या आरोपांना दुर्दैवी असे संबोधले होते. ट्रुडो यांनी असे विधान करून भारत आणि कॅनडाच्या संबंधांना संकटात लोटले आहे. कॅनडाने सार्वजनिकरीत्या असे आरोप करणे दुर्दैवी आहे. जर त्यांना भारताबाबत काही आक्षेप होते तर त्यांनी भारतासारख्या मित्र देशांशी खासगीमध्ये चर्चा करायला हवी होती. तसेच, याबाबत बंद दरवाजाआड चर्चा करणे गरजेचे होते, असेही त्यांनी नमूद केले होते.