इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा नरेंद्र मोदींवर विश्वास!

भारत रशिया युद्ध मोदीच थांबवू शकतील, अशी खात्री

इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांचा नरेंद्र मोदींवर विश्वास!

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यानंतर आता इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनीही युक्रेन युद्ध संपवण्यात भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, असे म्हटले आहे. जॉर्जिया मेलोनी यांनी शनिवारी (७ सप्टेंबर) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतल्यानंतर हे विधान केले. रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात, असे जॉर्जिया मेलोनी म्हटले आहे.

रशिया आणि युक्रेन यांच्यात २०२२ पासून युद्ध सुरु आहे. या युद्धात दोन्ही देशांमधील हजारो सैनिक, नागरिक, लहान मुले मृत्यू पावली आहेत. युद्ध संपवण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अपयशी ठरला. पंतप्रधान मोदींचा युक्रेन दौरा नुकताच पार पडला होता. युद्ध बंदीच्या बाबतीत पंतप्रधान मोदी मध्यस्थी करून, यावर तोडगा काढतील अशी आशा आहे. याच दरम्यान, रशिया आणि युक्रेनमधील संघर्ष सोडवण्यासाठी भारत आणि चीन भूमिका बजावू शकतात, असे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी म्हटले आहे.

मिडिया रिपोर्टनुसार,  सेर्नोबिओ येथील ॲम्ब्रोसेटी फोरममध्ये झालेल्या भाषणादरम्यान जॉर्जिया मेलोनी यांनी हे वक्तव्य केले. यावेळी वोलोडिमिर झेलेन्स्की देखील उपस्थित होते. जॉर्जिया मेलोनी म्हणाल्या, माझा विश्वास आहे की, चीन आणि भारत संघर्ष सोडवण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. युक्रेनला एकटे टाकून हा संघर्ष सोडवला जाऊ शकतो, असा विचार करणे शक्य नाही. आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन झाल्यास संघर्ष आणि संकट आणखी वाढेल हे स्पष्ट आहे. परंतु हे देखील स्पष्ट आहे की जसजसे संकट वाढत जाईल तसतसे जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, असे मेलोनी म्हणाल्या.

हे ही वाचा :

मध्य प्रदेशच्या रतलाममध्ये गणपतीच्या आगमनावेळी दगडफेक !

भारताकडून झिम्बाब्वे, झांबियाला तांदूळ, मक्याची मदत !

वारीची परंपरा गढूळ करणाऱ्यांचा बंदोबस्त व्हायलाच हवा !

चक्रव्यूह तोडता येईल का?

मेलोनी यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी देखील दोन्ही देशाच्या युद्धावर तोडगा काढण्यासाठी भारत महत्त्वाची भूमिका बजावू शकतो, अशी कबुली दिली होती. युक्रेनवरील संभाव्य शांतता चर्चेत चीन, भारत आणि ब्राझील मध्यस्थाची भूमिका बजावू शकतात, असे वक्तव्य व्लादिमीर पुतिन यांनी केले होते.

Exit mobile version