भारताला ऑलिंपिकमध्ये २१ पदकांची अपेक्षा

भारताला ऑलिंपिकमध्ये २१ पदकांची अपेक्षा

टोकियोमध्ये ऑलिंपिक स्पर्धा सुरू होत आहेत. या स्पर्धेमध्ये भारत सर्वोत्तम कामगिरी करेल असा विश्वास देशातील ऑलिंपिक समितीकडून व्यक्त केला जात आहे. असोसिएटेड प्रेस या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार संभाव्य पदकविजेत्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या भाकितानुसार भारताला एकूण २१ पदकं मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे.

ऑलिंपिक स्पर्धेमध्ये यंदा भारताला अनेक पदकांची अपेक्षा आहे. ऑलिंपिक समितीने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार भारत २१ पदकं जिंकेल असे सांगितले जात आहे. यामध्ये एकूण ५ सुवर्ण, पाच रौप्य आणि ११ कांस्य अशी एकूण २१ पदकं कमावेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

हे ही वाचा:

केरळमध्ये ईद साजरी करताना कोरोनाचा धोका नाही

लखनौ विद्यापीठात विद्यार्थी गिरवणार सावरकरांच्या विचारांचे धडे

ठाणे जिल्ह्यात वाहून गेलेल्या पाचपैकी एकाचा मृत्यू 

बापरे! कळव्यात दरड कोसळली; एकाच घरातील पाच जण दगावले

या संभाव्य यादीत अनेक खेळाडूंची नावे आहेत. या यादीनुसार भारताची नेमबाजीत सर्वोत्तम कामगिरी राहिल. हा अंदाज खरा मानल्यास नेमबाजीतून भारताला ५ सुवर्ण, ३ रौप्य आणि ५ कांस्य पदके मिळण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. त्याबरोबरच भारताला तिरंदाजी आणि बॉक्सिंगमध्ये देखील पदके मिळण्याची शक्यता व्यक्त केली आहे.

या अंदाजानुसार भारताला बॅडमिंटनमध्ये धक्का बसणार आहे. या स्पर्धेमध्ये भारताची बॅडमिंटन खेळाडू पी व्ही सिंधु हिला कोणतेही पदक मिळणार नसल्याचे भाकित व्यक्त केले आहे. तर नीरज चोप्राकडून भालाफेकीत चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे, परंतु तो संभाव्य पदक विजेत्यांच्या यादीत नाही.

Exit mobile version