भारतात मार्चमध्ये उष्णतेचा विक्रमी पारा

भारतात मार्चमध्ये उष्णतेचा विक्रमी पारा

भारताने मार्च २०२२ मध्ये गेल्या अनेक वर्षातील उष्णतेचा विक्रम मागे टाकला आहे. भारतात या वर्षी मार्चमध्ये सर्वात उष्ण दिवसांची नोंद करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) विश्लेषणातून समोर आली आहे. या महिन्यात देशभरातील कमाल तापमान सामान्यपेक्षा १.८६ अंश सेल्सिअस जास्त राहिले. भारतात मार्च २०२२ मध्ये सुमारे गेल्या १२१ वर्षांतील सरासरी उष्णतेचा विक्रम मोडला आहे. हा विक्रमी आकडा वायव्य आणि मध्य भारतातील कमाल तापमानातील मोठ्या फरकामुळे नोंदवला गेला आहे.

एका अहवालानुसार, देशभरातील सरासरी पाऊस मार्च महिन्यातील दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा ७१ टक्के कमी असल्याचेही आढळून आले आहे. भारताच्या वायव्य प्रदेशात सर्वाधिक सरासरी कमाल तापमानाची नोंद झाली आहे. तर मध्य भारताने १९०१ पासून दिवसाच्या तापमानाच्या बाबतीत मार्च महिन्याचा दुसरा सर्वात उष्ण तापमान नोंदवला आहे. मार्च महिन्यात देशातील बहुतांश भागात उष्णतेचे जास्त प्रमाण नोंदवले गेले आहे.

हवामान तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्चमध्ये वाऱ्याच्या पॅटर्नमधील असामान्य बदलामुळे भारतात या महिन्यात जास्त उष्णतेचि नोंद झाली. या उष्णतेचे आणखी एक कारण म्हणजे पाऊस नसणे हे देखील आहे. भारतीय हवामान केंद्र पुणेचे शास्त्रज्ञ ओपी श्रीजीत म्हणाले की, एकूणच जागतिक तापमानवाढ हे देखील या उष्णतेचे एक प्रमुख कारण आहे. ला निया इव्हेंट्स दरम्यान देखील आपण बरेचदा उच्च तापमान नोंदवत असतो.

हे ही वाचा:

मोदी म्हणाले आगामी वर्षात सर्व मनोकामना पूर्ण होवोत

भारत-ऑस्ट्रेलियामध्ये झाला ‘ऐतिहासिक’ करार

‘आम्हाला उद्घाटनाला बोलावलं नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरु करा’

गुढीपाडव्याच्या दिनी सोन्याच्या दरात वाढ, चांदीही वधारली

मार्च २०२२ मध्ये, संपूर्ण देशाचे सरासरी कमाल, किमान आणि सरासरी तापमान अनुक्रमे ३३.१० डिग्री सेल्सियस, २०.२४ डिग्री सेल्सियस आणि २६. ६७ डिग्री सेल्सियस होते. तर १९८१ ते २०१० या कालावधीत सरासरी सामान्य तापमान ३१.२४°C, १८.८७°C आणि २५.०६°C होते. मार्चमध्ये वायव्य भारतात सरासरी कमाल तापमान हे ३.९१ अंश सेल्सिअसने जास्त होते. तर, सरासरी किमान तापमान किंवा रात्रीचे तापमानाची १९०१ नंतरचे दुसरे सर्वोच्च नोंद करण्यात आली आहे. जे सामान्यपेक्षा २.५३ अंश सेल्सिअस जास्त होते.

Exit mobile version