काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा परदेशात जाऊन भाजपवर टीका करणे सुरूच ठेवले आहे. ‘विरोधी गट इंडिया हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारतीय संस्था काबीज करू देणार नाही. लोकशाहीची होणारी हत्याही कदापि सहन केली जाणार नाही. आताही अनेक जण लोकशाहीच्या पायाला धक्का देणाऱ्यांविरुद्ध लढत आहेत. ही लढाई संपलेली नाही आणि आम्हाला वाटते, आम्ही ही लढाई जिंकू,’ अशा शब्दात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा गळा काढला आहे.
या महिन्याच्या सुरुवातीला नॉर्व्हेमधील ओस्लो विद्यापीठात झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले आहे. या कार्यक्रमाचा व्हिडीओ नुकताच काँग्रेसने प्रसिद्ध केला. ‘इंडिया आघाडीमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक व्यक्तीला मग तो कोणत्याही पक्षाचा असो, तो लोकशाहीची हत्या कदापि सहन करणार नाही, या एका मुद्द्यावर सहमत आहेच. परदेशात जाऊन आरएसएसवर टीका करण्याची परंपराही राहुल गांधी यांनी नॉर्वेतही कायम राखली. रास्व संघाला आमच्या संस्थात्मक पायावर कदापि नियंत्रण मिळू नये, यावर आमचे एकमत आहे,’ असे ते म्हणाले.
भारतात सगळे कसे वाईट चालले आहे याचा पाढाही राहुल गांधी यांनी वाचला.
हे ही वाचा:
महिला आरक्षण विधेयकाचे श्रेय नरसिंह राव यांना !
ऐतिहासिक महिला विधेयक संसदेत मंजूर!
इंडोनेशियाच्या शेल इको स्पर्धेत संघवी कॉलेजचे प्रतिनिधित्व करणार चिपळूणचा सुपुत्र
सुशिकला आगाशे, मयुरी लुटे भारतीय संघात
‘भारतात केवळ दोन-तीन उद्योग घराण्यांची एकाधिकारशाही आहे. गेल्या नऊ वर्षांत २० कोटींहून अधिक लोक गरिबीत ढकलले गेले आहेत,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘सरकारला आरोग्य आणि शिक्षणावर अधिकाधिक खर्च केला गेला पाहिजे, याबाबत आमचे एकमत आहे,’ असे सांगतानाच काही लोकांचे समूह दलित, आदिवासी, अल्पसंख्याकांच्या विकासाच्या प्रवासात सहभागी होत नाहीत, असेही ते म्हणाले.
‘इंडिया’मधील मतभेदाची कबुली
विद्यापीठात झालेल्या खुल्या चर्चेत राहुल गांधी यांनी ‘इंडिया’ आघाडीतील मतभेदाचीही कबुली दिली. याबाबत त्यांनी केरळचे उदाहरण दिले. ‘काँग्रेसचा डाव्यांना विरोध आहे. मात्र दक्षिणेकडील राज्यांत भाजपचे सरकार कधीही येऊ नये, हे लक्ष्यही आम्हाला सुनिश्चित करायचे आहे. तसेच, आणखी काही राज्यांत परिस्थिती बिकट आहे. बंगालमध्ये भाजपच्या विरुद्ध उभे राहणेच फायदेशीर ठरेल,’ असे ते म्हणाले.