33 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरविशेष२०३६ चे ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स भारतात होणार?

२०३६ चे ऑलिम्पिक, पॅरालिम्पिक गेम्स भारतात होणार?

भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला पाठवले पत्र

Google News Follow

Related

क्रीडा क्षेत्रात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन भारतात व्हावे यासाठी भारताकडून विशेष प्रयत्न केले जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी भारताकडून पहिले पाऊल देखील उचलण्यात आले आहे. माहितीनुसार, भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या यजमान समितीला या संदर्भात पत्र पाठवले आहे. हे पत्र १ ऑक्टोबर रोजी पाठविण्यात आले होते. याद्वारे भारताने २०२३ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धांचे यजमानपद भूषवण्यामध्ये स्वारस्य दाखवले आहे.

भारताने २०३६ च्या ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक गेम्सच्या यजमानपदासाठी अधिकृतपणे बोली लावली आहे. भविष्यातील यजमानपदासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीला औपचारिक पत्रही पाठवले आहे, असे वृत्त एएनआयने दिले आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (IOA) १ ऑक्टोबर रोजी औपचारिकपणे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (IOC) भविष्यातील यजमान आयोगाला २०२६ मध्ये ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक खेळांचे आयोजन करण्यात भारताचे स्वारस्य असल्याचे कळवले आहे.

भारताने नुकत्याच पार पडलेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पाच कांस्य आणि एका रौप्यपदकांसह सहा पदकांची कमाई केली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, भारत २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

हे ही वाचा : 

शरद पवार घेणार राजकीय निवृत्ती?

सलमान खानला धमकी देऊन पाच कोटींची मागणी करणाऱ्याला कर्नाटकातून अटक

‘संजय वर्मा राज्याचे नवे पोलीस महासंचालक’

‘गाझावर १० ट्वीट, पण कॅनडातील हिंदूंबाबत मौन’

ऑलिम्पिक अधिकाऱ्यांनी ऑक्टोबर महिन्यात स्पष्ट केले आहे की, यजमानपदासाठी १० संभाव्य देशांशी चर्चा सुरू आहे. ऑलिम्पिक अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली यजमानपद कोणत्या देशाला देण्यात यावे, याचे अधिकार देण्याची प्रक्रिय गुप्त असते. २०३६ च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी स्वारस्य दाखवणाऱ्या १० देशांमध्ये भारताचा समावेश आहे. भारताने अद्याप ऑलिम्पिकचे आयोजन केलेले नाही. भारताने फक्त आशियाई खेळ आणि राष्ट्रकुल खेळांचे आयोजन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा