वेस्ट इंडिज विरुद्धच्या दुसऱ्या एक दिवसीय सामन्यात भारतीय संघाने ४४ धावांनी विजय मिळवत मालिकेवर कब्जा केला आहे. या तीन एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी निर्णायक आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाने नाणेफेक गमावल्यानंतर वेस्टइंडीजने भारताला प्रथम फलंदाजीसाठी बोलावले होते. सामन्याच्या सुरूवातीलाच सर्वांना आश्चर्याचा पहिला धक्का बसला कारण कर्णधार रोहित शर्मा सोबत ऋषभ पंत सलामीला आला होता. पण हा प्रयोग अपेक्षे इतका यशस्वी ठरला नाही. भारताने आपले पहिले तीन फलंदाज स्वस्तात गमावले. पण त्यानंतर लोकेश राहुल आणि सूर्यकुमार यादव यांनी भारताचा डाव सावरला.
चौथ्या विकेटसाठी या दोघांनी मिळून ९१ धावांची भागीदारी रचली. पण ४९ धावांवर असताना राहुल धावबाद झाला. त्यानंतर ६४ धावा करून सूर्यकुमार यादवही माघारी परतला. खाली वॉशिंग्टन सुंदर (२४) आणि दीपक हूडा (२९) या दोघांनीही आपल्या परीने योगदान दिले. या सर्वांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाने धावफलकावर ५० षटकांत २३७ धावांपर्यंत मजल मारली.
पन्नास षटकांच्या खेळामध्ये २३८ धावांचे आव्हान हे विजयासाठी फार मोठे नव्हते. त्यामुळे वेस्ट इंडीज संघाला रोखणे ही नव्याने कर्णधारपद स्वीकारलेल्या रोहित शर्मा आणि भारतीय गोलंदाजांची कसोटी होती. पण या कसोटीत ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले आहेत.
हे ही वाचा:
विधानसभा निवडणूक मतदानापूर्वी मुख्यमंत्री योगींनी केला खास फोटो शेअर
‘व्यवसाय करणे हे सरकारचे काम नाही, जनतेला सुविधा पुरविण्याला प्राधान्य’
काय आहेत ‘हिजाब’बाबत घटनात्मक तरतुदी आणि इतर देशांतील स्थिती?
सचिन वाझे म्हणतो, मला अनिल देशमुखांनीच वसुलीचे आदेश दिले!
भारतीय संघाने तब्बल ४० धावांनी विजय मिळवला आहे. गोलंदाजीत योग्य वेळी केलेले बदल आणि योग्य प्रकारे केलेले क्षेत्ररचना यामुळे भारतीय संघाने हा विजय खेचून आणला आहे. प्रसिद्ध कृष्णाने षटकांमध्ये १२ धावा देत ४ गडी बाद करण्याचा अनोखा कारनामा करून दाखवला. तर शार्दूल ठाकूरनेही ९ षटकांमध्ये ४१ धावा देत २ विकेट घेऊन त्याला चांगली साथ दिली.
या विजयासह भारताने मालिकेत विजयी आघाडी घेतली आहे. या मालिका विजयासह भारताने एक अनोखा विश्वविक्रम रचला आहे. भारताने वेस्ट इंडिज विरोधात सलग ११ मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम केला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना ११ फेब्रुवारी रोजी अहमदाबाद येथेच खेळला जाणार आहे. हा सामना जिंकून वेस्ट इंडिजला व्हाईटवॉश देण्याचे उद्दिष्ट भारतीय संघासमोर असेल.