तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर

तळपत्या रवी, सूर्या समोर वेस्ट इंडीजचा संघ ढेर

वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी २० मालिकेत भारताने विजयी सलामी दिली आहे. मालिकेतील पहिल्या टी २० सामन्यात भारताने वेस्ट इंडिज संघाचा सहा विकेट्सने पराभव केला आहे. भारताचा कर्णधार रोहित शर्मा, मधल्या फळीतील फलंदाज सुर्यकुमार यादव आणि या सामन्यातून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात करणारा अष्टपैलू खेळाडू रवी बिष्णोई यांच्या कामगिरीच्या जोरावर भारताने हा सामना जिंकला.

भारताने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडीज संघाची सुरुवात डळमळीत झाली. भुवनेश्वर कुमारच्या पहिल्याच षटकात वेस्ट इंडीजचा सलामी फलंदाज ब्रॅंडन किंग हा माघारी परतला. पण त्यानंतर मेयर्स आणि निकलस पुरन यांनी वेस्ट इंडिजचा डाव सावरला. पुरनने ६१ धावांची खेळी करत आपले अर्धशतक साजरे केले. यामध्ये त्याने ४ चौकार आणि ५ षटकारांची आतषबाजी केली. या खेळाच्या जोरावरच वेस्ट इंडीज संघाने २० षटकांमध्ये १५७ धावांची मजल मारली. भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोई हा वेस्टइंडीज संघासाठी डोकेदुखी ठरला. त्याने ४ षटकांमध्ये केवळ १७ धावा देत दोन फलंदाज बाद केले.

हे ही वाचा:

संजय राऊतांचा डोळा उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर

अजित डोभाल यांच्या घरात शिरली एक अज्ञात व्यक्ती

‘अरविंद केजरीवाल हे खलिस्तान समर्थक; सत्तेसाठी हा माणूस कोणत्याही थराला जाईल’

मोहित कंबोज म्हणतात, म्हणून संजय राऊत यांना घाम फुटला!

१५८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानात उतरलेले भारताचा सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन सुरुवातीपासूनच वेस्ट इंडिज गोलंदाजांवर तुटून पडले. जवळपास दहाच्या धावगतीने ते दोघं खेळत होते. त्या दोघांनी मिळून ६४ धावांची भागीदारी केली. ज्यामध्ये रोहितने १९ चेंडूत ४० धावांची धुवाधार खेळी केली.

पण त्यानंतर भारताचा डाव थोडासा डळमळल्या सारखा वाटला कारण रोहित शर्मा आणि ईशान किशन बाद झाल्यावर विराट कोहली आणि ऋषभ पंत हे दोघेही स्वस्तात माघारी परतले. पण सूर्यकुमार यादव आणि व्यंकटेश अय्यर यांनी मधल्या फळीत अतिशय चमकदार कामगिरी करत भारताची नौका पार करून दिली.

सूर्यकुमार यादवने १८ चेंडूत ३४ धावा केल्या तर व्यंकटेश अय्यरने १३ चेंडूत २४ धावा केल्या. भारताचा युवा अष्टपैलू खेळाडू रवी बिश्र्नोई हा या सामन्याचा सामनावीर ठरला. या मालिकेत अजून दोन सामने खेळले जाणार असून पुढील सामना शुक्रवार १८ फेब्रुवारी रोजी खेळला जाणार आहे.

Exit mobile version