न्यूझीलंडला ३-२ हरवले
भारताच्या ऑलिम्पिक वाटचालीची विजयी घोडदौड सुरू झाली आहे. शनिवार २४ जुलै रोजी भारताने आपला पहिला विजय नोंदवला आहे आणि तोही राष्ट्रीय खेळ असणाऱ्या हॉकीमध्ये! भारतीय हॉकी संघाच्या सलामीच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंड संघाचा ३-२ असा पराभव केला आहे.
शनिवारी सकाळी भारत विरुद्ध न्यूझीलंड हा हॉकीचा सामना खेळला गेला. सामन्याच्या सुरुवातीलाच न्यूझीलंड संघाने १-० अशी बढत घेतली होती. सहाव्या मिनिटाला केन रसेल याने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. पण भारताकडून रुपिंदर पाल याने बरोबरी साधली. त्यानंतर हरमनप्रीत सिंग यांनी केलेल्या गोलच्या जोरावर भारताला २-१ कशी मदत मिळाली. पुढे ही बढत भारताने ३-१ अशी वाढवली.
हे ही वाचा:
लडाखमध्ये उभे राहणार केंद्रीय विश्वविद्यालय
श्रीलंकेने घेतली भारताची फिरकी
राष्ट्रपती भवन पुन्हा होणार पर्यटकांसाठी खुले
कोल्हापूरला पुराचा पुन्हा वेढा
न्यूझीलंड संघाने सामन्यात परतण्याचा जोमाने प्रयत्न केला. पण ते केवळ एक गोल नोंदवू शकले. यामुळे सामन्याच्या अंतिम निकाल ३-२ असा राहिला. या विजयासह भारताने ऑलिम्पिक प्रवासाची विजयी सुरुवात केली आहे. भारतीय संघाचा पुढचा सामना हा बलाढ्य अशा ऑस्ट्रेलियासमोर असणार आहे. रविवारी दुपारी ३ वाजता हा सामना रंगणार आहे. तर शनिवारी संध्याकाळी भारतीय महिलांचा हॉकी सामना नेदरलँड्स संघाबरोबर होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी सव्वा पाच वाजता हा सामना क्रीडा रसिकांना पाहता येईल.