भारतीय महिला क्रिकेट संघाने बुधवारी दक्षिण आफ्रिकेवर चार धावांनी मात केली. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शतकांच्या जोरावर ५० षटकांत तीन विकेट गमावून ३२५ धावा केल्या. त्याला प्रत्युत्तर देताना दक्षिण आफ्रिकेसाठी कॅप आणि लॉरा यांनीही शतक ठोकले. मात्र दक्षिण आफ्रिकेचा संघ ५० षटकांत सहा विकेट गमावून ३२१ धावाच करू शकली. भारताच्या वतीने दीप्ती शर्मा आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
३२६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात चांगली झाली नाही. धावफलकावर १४ धावा असतानाच आफ्रिकेची पहिली विकेट गेली. तजमीन ब्रिट्स ११ चेंडूंत पाच धावाच करू शकली. एनेके बॉश याने २३ चेंडूंत १८ धावा केल्या. लुसने १२ धावा केल्या. त्यानंतर कॅप आणि लॉरा यांनी १७० चेंडूंत १८४ धावांची भागीदारी केली. मॅरिजन कॅप ९४ चेंडूंत ११४ धावा करून बाद झाली. तिने ११ चौकार आणि तीन षटकार लगावले. नादिन डी क्लर्कने २२ चेंडूंत २८ धावा केल्या. कर्णधार लॉरा वोल्वाइट १३५ चेंडूंत १३५ धावा करून नाबाद राहिली. तिने १२ चौकार आणि तीन षटकार लगावले. आफ्रिकेला शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी ११ धावा हव्या होत्या. मात्र संघ सहा धावाच करू शकला.
हे ही वाचा..
१४ खरिप पिकांना केंद्राकडून किमान आधारभूत किंमत जाहीर; दीडपट मोबदला मिळणार
ऐतिहासिक दोन शतकानंतर गोलंदाजीतही स्मृती मंधानाची कमाल
स्मृती मंधाना आणि कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या शतकांच्या जोरावर भारताने दुसऱ्या महिला एकदिवसीय क्रिकेट आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात बुधवारी दक्षिण आफ्रिकेसमोर ३२५ धावांचे लक्ष्य ठेवले. मंधाना हिने १२० चेंडूंत १८ चौकार आणि दोन षटकारासह १३६ धावा केल्या. तर, हरमनप्रीतने ८८ चेंडूंत नऊ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद १०३ धावा केल्या. हे तिचे सहावे आंतरराष्ट्रीय शतक ठरले. दोघींनी तिसऱ्या विकेटसाठी १७१ धावांची भागीदारी केली.