26 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरविशेष‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

‘सूर्या’ने झेल पकडला; भारताने टी-२० वर्ल्डकप जिंकला!

हार्दिकचे अखेरचे षटक ठरले निर्णायक, विराटच्या ७६ धावांचा मोलाचा वाटा, दक्षिण आफ्रिकेवर ७ धावांनी मात करत रोमहर्षक लढत जिंकली

Google News Follow

Related

अखेरच्या षटकात अर्थात सहा चेंडूंत दक्षिण आफ्रिकेला विश्वचषक जिंकण्यासाठी १६ धावांची गरज होती. हार्दिक पंड्याच्या त्या षटकात दक्षिण आफ्रिकेला ९ धावा करता आल्या आणि ७ धावांनी भारताने टी-२० विश्वचषकावर नाव कोरले. २००७मध्ये भारताने पहिल्यावहिल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये विजेतेपद पटकाविले होते. त्यावेळी त्या संघाचा एक भाग राहिलेल्या रोहित शर्माने यावेळी आपल्या कर्णधारपदाखाली विजेतेपद मिळवून दिले. भारताचे हे दुसरे टी-२० वर्ल्डकप विजेतेपद ठरले.

अखेरच्या षटकात अर्थात ६ चेंडूंत दक्षिण आफ्रिकेला १६ धावांची गरज होती. रोहितने चेंडू हार्दिक पंड्याच्या हाती सोपविला. पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरने मोठा फटका मारला. पण लाँगऑफ सीमारेषेवर सूर्यकुमारने झेल पकडला पण तो सीमारेषेच्या बाहेर जात असतानाच त्याने चेंडू हवेत उडविला आणि तो सीमारेषेबाहेर गेला. पुन्हा मैदानात उडी मारत त्याने हवेतला चेंडू झेलला. मिलरचा खेळ संपुष्टात आला. सूर्यकुमारने झेल पकडला आणि भारताच्या हातात विश्वचषकच जणू पडला.

पाच चेंडूंत १६ धावांची आवश्यकता होती. रबाडाने हार्दिकला फटका लगावला आणि त्याच्या बॅटची कड घेत चेंडू थर्ड मॅनला चौकार गेला. दक्षिण आफ्रिकेला ४ चेंडूंत १२ धावांची गरज होती. तिसऱ्या चेंडूवर बाय धाव मिळाली आणि दक्षिण आफ्रिकेला ३ चेंडूंत ११ धावांची गरज होती. चौथ्या चेंडूवर लेगबाय मिळाला आणि २ चेंडूंत १० धावा हव्या होत्या. पाचवा चेंडू मात्र वाईड पडला. दक्षिण आफ्रिकेच्या थोड्या आशा जागृत झाल्या. पाचव्या चेंडूवर रबाडा झेलचीत झाला. हा झेलही सूर्याने पकडला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर ९ धावांची आवश्यकता असताना नॉर्तेने एक धावा काढली आणि वर्ल्डकप विजेतेपदावर भारताने शिक्कामोर्तब केले.

हे ही वाचा:

रेल्वे पोलिसांनी अंधेरी स्थानकात गर्दुल्याच्या मुसक्या आवळल्या!

काल्की २८९८ एडीची घसघशीत कमाई…’पौराणिक’ तडका लागलेल्या चित्रपटांना अच्छे दिन!

राज्यात ज्येष्ठ नागरिकांसाठी ‘मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र योजाना’ सुरु करणार

बिहारमध्ये ११ दिवसांत पाच पूल कोसळले

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार राहिलेल्या आणि अपयशामुळे टीकेचा धनी  ठरलेल्या हार्दिकने यावेळी मात्र कमाल करून दाखविली. त्याने या षटकात ९ धावा दिल्या आणि भारताला रोमहर्षक विजय मिळवून दिला. या विजयानंतर त्याने अश्रुंना वाट मोकळी करून दिली. तिकडे कर्णधार रोहित शर्मादेखील आपले आनंदाश्रु लपवू शकला नाही. प्रशिक्षक म्हणून अखेरची स्पर्धा खेळत असलेल्या राहुल द्रविडचा आनंदही गगनात मावेनासा झाला. सगळ्या सपोर्ट स्टाफसह त्याने हा आनंद साजरा केला. विराटवरही सर्वांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्याची ७६ धावांची खेळी महत्त्वाची ठरली.

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली. रोहित शर्मा ९ धावांवर बाद झाला पण विराटने २ षटकार आणि ६ चौकारांच्या सहाय्याने ७६ धावांची खेळी करत भारताला ७ बाद १७६ धावांपर्यंत नेले. अक्षर पटेलने ४७ धावांची खेळी केली तर शिवम दुबेने २७ धावा केल्या.

१७७ धावांचे लक्ष्य गाठताना दक्षिण आफ्रिकेला १२ धावांत २ धक्के बसले पण नंतर क्विन्टन डीकॉक आणि ट्रिस्टन स्टब्स यांनी ५८ धावांची भागीदारी करत संघाला सावरले. क्लासेनने ५२ धावा करत भारतीय गोलंदाजांना घाम फोडला होता. पण पंड्याने क्लासेनचा खेळ संपुष्टात आणला आणि नंतर त्यानेच अखेरच्या षटकात दक्षिण आफ्रिकेकडून सामना खेचून घेतला. त्याने ३ षटकांत २० धावा देत ३ बळी घेतले. बुमराह आणि अर्शदीपने प्रत्येकी २ बळी घेतले.

सामन्यात सर्वोत्तम विराट कोहली ठरला तर स्पर्धेत सर्वोत्तम ठरला जसप्रित बुमराह.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा