भारताचा इंग्लंडवर डावाने विजय

भारताचा इंग्लंडवर डावाने विजय

भारत-इंग्लंड दरम्यानचा चौथा कसोटी सामना हा भारताने जिंकला. भारताने इंग्लंडला एक डाव आणि २५ धावांनी पराभूत केले. भारताने इंग्लंडचा शेवटचा डाव १३५ धावात गुंडाळला. हा सामना जिंकून भारताने ही मालिका ३-१ अशी जिंकली.

आज तिसऱ्या दिवसाची भारताची सुरवात अत्यंत खंबीरपणे झाली. वॉशिंग्टन सुंदर आणि अक्सर पटेल यांनी पहिले सत्र जवळपास पूर्ण खेळून काढले. परंतु शेवटच्या काही ओव्हर बाकी असताना अक्सर पटेल धावचीत झाला. त्या पुढच्याच ओव्हरला इशांत शर्मा आणि मोहम्मद सिराज हे पहिल्या ४ चेंडूंमध्येच बाद झाले. त्यामुळे दुसऱ्या टोकावर असलेला वॉशिंग्टन सुंदर हा ९६ धावांवर नाबाद राहिला. वॉशिंग्टन सुंदरचे मोठ्या कष्टाने कमावलेले शतक जरी हुकले असले तरी भारताने १६० धावांची आघाडी घेतलेली होती आणि भारत अतिशय भक्कम स्थितीत आलेला होता.

हे ही वाचा:

दुसऱ्या दिवशी पंतने भारताला तारले

दुसऱ्या सत्रात सुरवातीपासूनच इंग्लंडचे गडी बाद व्हायला सुरवात झाली. रविचंद्रन अश्विनने, क्रॉली आणि आणि बेअरस्टोची विकेट लागोपाठ घेऊन इंग्लंडवर दबाव आणला. त्यानंतर सातत्याने इंग्लंडच्या विकेट पडत गेल्या आणि अश्विन, अक्सर पटेल या दोघांनीही ५-५ गडी बाद करत, इंग्लंडचा संघ १३५ धावांमध्ये गुंडाळला. या मालिकेत विजय मिळवून भारताने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात आपले स्थानही पक्के केले आहे.

Exit mobile version