भारताच्या औषध नियामकाने मुलांसाठी खोकल्याच्या औषधाच्या वापरावर बंदी घातली आहे आणि लेबलवर स्पष्ट चेतावणी देण्याचे आदेश दिले आहेत. कफ सिरपमुळे जगभरात १४१ हून अधिक मुलांचा मृत्यू झाल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. वृत्तसंस्था रॉयटर्सच्या मते, नियामकाने सांगितले की, परवानगीशिवाय लहान मुलांमध्ये खोकल्याच्या औषधाच्या जाहिरातीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती, त्यानंतर चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे औषध न देण्याची शिफारस करण्यात आली होती.
भारतीय औषध नियामक सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांमध्ये अँटी-कोल्ड ड्रग कॉम्बिनेशनच्या वापरावर बंदी घातली आहे. हे औषध तयार करत असताना या औषधांच्या मिश्रणामध्ये क्लोरफेनिरामाइन मॅलेट आणि फेनिलेफ्रिन यांचा समावेश होतो.सर्दीच्या लक्षणांवर उपचार करण्यासाठी सिरप किंवा गोळ्यांमध्ये या औषधांचा वापर होतो.
हे ही वाचा:
राम मंदिर उद्घाटनासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिळाले निमंत्रण!
स्थलांतर प्रश्नाच्या तोडग्यासाठी युरोपियन युनियनच्या ‘स्थलांतर धोरणा’त दुरुस्तीसाठी करार
सीरियामधील व्यक्तीला भेटण्यासाठी साकिबला पडघ्यात पाठवलं
संसद सुरक्षा भंग प्रकरणी आणखी दोघे पोलिसांच्या ताब्यात, माजी पोलीस उपअधीक्षकाच्या मुलाचा समावेश!
या औषधांच्या वापरामुळे गेल्या वर्षी गॅम्बिया, उझबेकिस्तान आणि कॅमेरूनमध्ये किमान १४१ मुलांचा मृत्यू झाला आहे. भारतात २०१९ मध्ये देशात बनवलेले कफ सिरप खाल्ल्यानंतर किमान १२ मुलांचा मृत्यू झाला आणि इतर चार जण गंभीररित्या अपंग झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
६ जून रोजी झालेल्या विषय तज्ज्ञ समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा झाली होती.त्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) राजीव रघुवंशी यांनी या संदर्भात सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या औषध नियंत्रकांना पत्र पाठवून सूचना जारी केल्या आहेत.पत्रात म्हटले आहे की, चार वर्षांखालील मुलांना देण्यात येणाऱ्या कफ सिरपमध्ये एफडीसीचा वापर करू नये आणि त्यानुसार कंपन्यांनी लेबल आणि पॅकिंगवर या संदर्भात चेतावणी नमूद करावी, असे पत्रात नमूद केले आहे.