भारताच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या आणखी ५४ चिनी ऍप्सवर सरकार बंदी घालणार आहे. देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला असलेला धोका लक्षात घेऊन गेल्या वर्षी जूनमध्ये भारताने ५९ चिनी मोबाईल ऍप्सवर बंदी घातली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकार देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या ५४ चिनी ऍप्सवर आजपासून सरकार बंदी घालणार आहे.
Govt of India to ban 54 Chinese apps that pose a threat to India’s security: Sources
— ANI (@ANI) February 14, 2022
या चायनीज ऍप्समध्ये ब्युटी कॅमेरा स्वीट सेल्फी, एचडी सेल्फी कॅमेरा- इक्वलायझर, टेनसेंट, अलीबाबा आणि गेमिंग कंपनी नेटएस सारख्या मोठ्या चीनी तंत्रज्ञान कंपन्यांच्या अँप्सचा समावेश आहे. याआधी गेल्या वर्षी जूनमध्ये, भारताने देशाच्या सार्वभौमत्वाला आणि सुरक्षेला धोका लक्षात घेऊन, टिकटॉक, विचॅट आणि हॅलो किपिंग सारख्या मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणार्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसह ५९ चीनी मोबाइल ऍप्सवर बंदी घातली होती. आणि ज्या ऍप्सवर बंदी घातली होती हे ऍप्स पुन्हा ब्रँडिंग करून भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
‘काँग्रेसचे आंदोलन म्हणजे नाना पटोलेंची नौटंकी’
नाना पटोलेंचे आंदोलन पोलिसांनी गुंडाळले
संजय राऊत यांच्या तोंडी ‘बरबाद’ करण्याची भाषा
‘राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना’
आयटी कायद्याच्या कलम 69A अंतर्गत या अँप्सवर बंदी घालण्यात आली आहे. २०२० मध्ये अँप्सवर बंदी घालण्याची ही कारवाई चीनसोबतच्या सीमेवरील तणावादरम्यान पूर्व लडाखच्या गलवान खोऱ्यात हिंसक चकमकीत वीस भारतीय सैनिक आणि अनिर्दिष्ट संख्येने चिनी सैनिक मारले गेल्यानंतर करण्यात आली होती.
या यादीत Garena फ्री फायर नावाचा लोकप्रिय गेमचाही समावेश असल्याचे समोर येत आहे.तसेच या ऍप्ससह क्लोन ऍप्सचाही समावेश आहे. आणखी ५० प्रतिबंधित ऍप्ससह भारताने बंदी घातलेल्या ऍप्सची संख्या एकूण ३२० पर्यंत पोहोचू शकते.