मुंबई हल्ल्यातील आरोपी दहशतवादी हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली आहे. पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाईंड दहशतवादी हाफिज सईदला भारताच्या ताब्यात देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारत सरकारने पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे या दहशतवाद्याला ताब्यात देण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबाचा संस्थापक आणि दहशतवादी हाफिज सईदच्या प्रत्यार्पणाची औपचारिक विनंती भारत सरकारने पाकिस्तानकडे केल्याचे सांगण्यात येत आहे.पाकिस्तानी मीडिया इस्लामाबाद पोस्टनेही हा दावा केला आहे.इंडिया टुडेच्या बातमीनुसार,पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाला भारत सरकारकडून अधिकृत विनंती प्राप्त झाली आहे, ज्यामध्ये हाफिज सईदच्या प्रत्यार्पणासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याची विनंती करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
चॅट जीपीटीला रिलायन्स जिओ इन्फोकॉमचे ‘भारत जीपीटी’ देणार टक्कर
अयोध्या; चौरासी (८४) कोसी परिक्रमा परिसरात ‘दारू बंदी’!
डीएमडीके प्रमुख आणि अभिनेते विजयकांत यांचे कोरोनाने निधन!
हाफिज मोहम्मद सईद हा मुंबईतील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे.या हल्ल्यात सहा अमेरिकन नागरिकांसह १६६ लोक मारले गेले होते. अमेरिकेनेही हाफिजच्या संघटनेला दहशतवादी घोषित केले आहे. अमेरिकेने त्याच्यावर १० दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस ठेवले आहे.सध्या असे मानले जाते की, हाफिज मोहम्मद सईद पाकिस्तानच्या तुरुंगात आहे.