नायजरमधील परिस्थिती बिघडली; भारतीयांना मायदेशी परतण्याचे आवाहन!

परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय नागरिकांना परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांच्या प्रवासाच्या योजनांवर पुनर्विचार करण्याचा सल्ला

नायजरमधील परिस्थिती बिघडली; भारतीयांना मायदेशी परतण्याचे आवाहन!

लोकशाही पद्धतीने निवडून आलेले अध्यक्ष मोहम्मद बझौम यांना पदच्युत करणाऱ्या लष्करी बंडानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) गुरुवारी भारतीय नागरिकांना नायजर सोडण्याचे आवाहन केले आहे.तेथील भारतीयांना ‘लवकरात लवकर’ देश सोडण्यास सांगितले असून जे लोक नायजरला जाण्याची योजना आखत असतील त्यांनी परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांच्या प्रवासाच्या योजनांवर पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

 

प्रसारमाध्यमांना संबोधित करताना, परराष्ट्र मंत्रालयाचे (MEA) प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारत सरकार नायजरमधील चालू घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.सध्याची परिस्थिती पाहता ज्या भारतीय नागरिकांची उपस्थिती आवश्यक नाही त्यांना शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांनी लक्षात ठेवावे की हवाई क्षेत्र सध्या बंद आहे. जमिनीच्या सीमेवरून निघताना स्वतःची सुरक्षितता सुनिश्चित करून अत्यंत सावधगिरी बाळगून यावे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.नायजरमध्ये किती भारतीय नागरिक आहेत असे विचारले असता, जवळजवळ २५० भारतीय असल्याचे बागची यांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

आपचे खासदार राघव चढ्ढा राज्यसभेतून निलंबित !

जम्मू काश्मीरचे सार्वभौमत्व भारतात संपूर्ण विलीन

अमित शाहांची मोठी घोषणा; इंग्रजांच्या काळातले तीन कायदे बदलणार

बांके बिहारी मंदिराच्या जमिनीची कब्रस्तान म्हणून नोंद

जे लोक येत्या काही दिवसांत नायजरला जाण्याची योजना आखत असतील त्यांनाही परिस्थिती सामान्य होईपर्यंत त्यांच्या प्रवासाच्या योजनांवर पुनर्विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे, असे बागची यांनी सांगितले.MEA ने भारतीय नागरिकांना नायजरची राजधानी नियामी येथील भारतीय दूतावासात नोंदणी करण्यास सांगितले आहे.आम्हाला सांगण्यात आले आहे की ते सुरक्षित आहेत. आमचा दूतावास त्यांना देश सोडून जाण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे पुरवण्याचा प्रयत्न करत आहे.”ते पुढे म्हणाले.बागची यांनी पुढे नमूद केले की, हवाई क्षेत्र बंद आहे आणि जमिनीच्या सीमेवरून प्रवास करणे कठीण आहे. “परंतु आम्ही शक्य ते सर्व करत असल्याचे त्यांनी सांगितले.

Exit mobile version