टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, धोनीचा ‘कमबॅक’

टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, धोनीचा ‘कमबॅक’

साऱ्या देशाला उत्सुकता लागून राहिलेल्या आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार, ८ सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट बोर्डाने ही घोषणा केली आहे. तर या संघा सोबतच भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी याचाही कमबॅक झाला आहे. पण या वेळेला धोनी हा एका वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. धोनी हा भारतीय संघा सोबत मेंटर म्हणून जाणार आहे.

बुधवार, ८ सप्टेंबर रोजी भारतीय क्रिकेट बोर्ड आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर करणार हे नक्की झाले होते. तेव्हा पासूनच या संघात नेमक्या कोणत्या खेळाडूंना स्थान मिळणार याविषयी सगळीकडे चर्चा रंगलेली दिसली. सर्व क्रिकेट रसिक भारतीय क्रिकेट बोर्डाच्या अधिकृत घोषणेकडे नजर ठेवून होते.

हे ही वाचा:

सार्वजनिक गणेशोत्सव आगमन-विसर्जनात १० जण नाचणार

शिवडी बीडीडी चाळ रहिवासी वाट पाहात आहेत!

चोरट्यांकडे एक गाडी, आठ लॅपटॉप

विद्यार्थिनींना मिळणार एनडीएमध्ये प्रवेश

अशात रात्री नऊ वाजून दहा मिनिटांनी बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर हँडल वरून संघाची घोषणा करण्यात आली. अपेक्षेप्रमाणे टी-२० विश्वचषकात भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहली करणार आहे. तर उपकर्णधार पदाची धुरा रोहित शर्मा याच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे.

असा असेल विश्वचषकासाठीचा भारतीय संघ
मुख्य संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उप-कर्णधार), के.एल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, राहुल चहर, रविचंद्रन अश्विन, अक्सर पटेल, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी

राखीव: श्रेयस अय्यर, शार्दूल ठाकूर आणि दिपक चहर

Exit mobile version