टी-२० विश्वचषक २०२४ चे बिगूल १ जूनपासून वाजणार आहे. या स्पर्धेत भारताचा पहिला सामना आयर्लंडविरुद्ध होणार आहे. तो ५ जून रोजी खेळला जाणार आहे. परंतु भारतीय चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची. हा सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमध्ये होणार आहे. टीम इंडिया आपले सर्व सामने इथेच खेळणार आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ख्रिस गेलने या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे. गेलने म्हटले आहे की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना रंगतदार होणार आहे.
इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, गेल म्हणाला, ‘आयसीसीला जागतिक स्तरावर क्रिकेटचा विस्तार करायचा आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना न्यूयॉर्कमध्ये खेळला जाणार आहे. मला खात्री आहे की ही लढाई रंगतदार असेल. अमेरिकेने गेल्या वर्षी टी-२० स्पर्धेचे आयोजन केले होते जे यशस्वी झाले. अमेरिका आणि आजूबाजूच्या देशांमध्ये क्रिकेट अद्याप फारसे लोकप्रिय झालेले नाही. त्यामुळेच आयसीसी यंदा येथे टी-२० विश्वचषकाचे आयोजन करत आहे.
हेही वाचा :
१९९३ च्या साखळी स्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडाची निर्दोष मुक्तता
आदिवासी समाजातील २५ जणांनी स्वीकारला ख्रिश्चन धर्म
दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्यांना सरकारी नोकरी नाहीच
टी-२० मध्ये भारताचा पाकिस्तानवर दबदबा आहे. टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १२ टी-20 सामने खेळले गेले आहेत. या दरम्यान भारताने ८ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. एक सामना बरोबरीत सुटला आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा टी-२० सामना ऑक्टोबर २०२२ मध्ये खेळला गेला होता. टीम इंडियाने हा सामना ४ गडी राखून जिंकला. मात्र याआधी ४ सप्टेंबर २०२२ रोजी झालेल्या सामन्यात भारताला पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत.