अजिंक्य रहाणे (१८) आणि सलामीवीर रोहित शर्मा (१९) यांची दोन अंकी धावसंख्या वगळता भारतीय संघाला इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत सपशेल अपयशाचा सामना करावा लागला. लीड्स येथे सुरू असलेल्या या कसोटीच्या पहिल्याच दिवशी भारतीय संघ ७८ धावांत गारद झाला आणि त्याला प्रत्युत्तर देताना इंग्लंडने बिनबाद १२० धावा करत ४२ धावांची आघाडी घेतली.
या कसोटीतील पहिल्या दिवशी इंग्लंडचेच वर्चस्व राहिले. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला खरा पण हा निर्णय साफ फसला. कसोटीचा पहिला दिवस जणू ५० षटकांच्या वनडेसारखा खेळला गेला. भारताचा डाव ४०.४ षटकांतच आटोपला. त्यात इंग्लंडच्या जेम्स अँडरसनने अवघ्या ६ धावा देत घेतलेले ३ बळी आणि क्रेग ओव्हरटर्नने घेतलेले १४ धावांतील ३ बळी यामुळे भारतीय डावाला खिंडार पडले. के.एल. राहुल (०), चेतेश्वर पुजारा (१), विराट कोहली (कर्णधार, ७), ऋषभ पंत (२), रवींद्र जाडेजा (४), असे सगळे दिग्गज फलंदाज निराशा करत माघारी परतले. इंग्लंडच्या रॉबिनसन आणि सॅम करन यांनीही २ बळी घेत भारताला लगाम घातला.
हे ही वाचा:
राणेंची अटक हा देशपातळीवरचा गेम?
बापरे! त्याने केला आरोग्याशी ६८४ कोटींचा खेळ
उद्धव ठाकरेंना भाजपा पाठवणार ७५ हजार पत्रं
पॅरालिम्पिक्समध्ये अफगाणिस्तानचा ध्वज, पण खेळाडू एकही नाही
त्यानंतर भारताच्या या तुटपुंज्या धावसंख्येला उत्तर देताना इंग्लंडने बिनबाद १२० धावा केल्या. त्यात सलामीवीर रॉबिनसन ५२ धावांवर खेळत असून हसीब हमीद ६० धावांवर खेळत आहे. इंग्लंडने ४२ षटकांत ही धावसंख्या गाठली आहे.
स्कोअरबोर्ड
भारत पहिला डाव ७८ (रोहित शर्मा १९, अजिंक्य रहाणे १८, अँडरसन ६-३, ओव्हरटर्न १४-३) विरुद्ध
इंग्लंड पहिला डाव बिनबाद १२० (रोरी बर्न्स खेळत आहे ५२, हसीब हमीद खेळत आहे ना. ६०)