दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडी आघाडी एकवटला आहे.देशभरात ठीक ठिकाणी निदर्शने- आंदोलने केली जात आहेत.इंडी आघाडीकडून आता दिल्लीच्या रामलीला मैदानावर आता महारॅलीही काढण्यात येणार आहे.३१ मार्च रोजी ही रॅली निघणार आहे.इंडी आघाडीकडून आज( २४ मार्च) घोषणा करण्यात आली आहे.
दिल्लीतील मद्य धोरण गैरव्यवहारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक झाली आहे. कोर्टाने त्यांना २८ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे.आम आदमी पक्ष देखील इंडी आघाडीचा एक भाग आहे.केजरीवाल यांच्या अटकेविरोधात इंडी आघाडी एकजूट होऊन दिल्लीच्या रामलीला मैदानावर महारॅली काढण्याची घोषणा केली आहे.
हे ही वाचा :
अमरावती: २० हुन अधिक प्रवाशांसह एसटी बस दरीत कोसळली!
केजरीवाल यांच्या याचिकेवर तत्काळ सुनावणीस उच्च न्यायालयाचा नकार
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लेहमध्ये जवानांसोबत साजरी केली होळी!
दिग्विजय सिंग, कार्ति चिदंबरम काँग्रेसच्या चौथ्या यादीत
इंडि आघाडीतील आप आणि काँग्रेसने पत्रकार परिषद घेत या रॅलीची घोषणा केली.पत्रकार परिषदेत आप नेते गोपाल राय म्हणाले की, इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्ष देशाचे हित आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी ही महारॅली काढतील.लोकशाही आणि देश धोक्यात असल्याचे देखील ते म्हणाले.
दिल्ली जल मंत्री आतिशी म्हणाल्या की, ३१ मार्चला रामलीला मैदानात सकाळी १० वाजता इंडिया आघाडीकडून महारॅलीचं आयोजन करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांत सातत्याने लोकशाहीवर हल्ला झाला आहे. या देशातील लोकशाही वाचवण्याकरता या रॅलीचं नियोजन करण्यात आले आहे, असे मंत्री आतिशी म्हणाल्या.