अभिमानास्पद!! वर्षभराच्या आत १५० कोटी लसीकरण

अभिमानास्पद!! वर्षभराच्या आत १५० कोटी लसीकरण

लसीकरण मोहिमेत भारताने अनेक विक्रम करत यशाचे टप्पे गाठले आहेत. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी भारताने आणखी एक विक्रमी टप्पा गाठला आहे. भारताने १५० कोटी म्हणजेच १.५ अब्ज लसीचे डोस देण्याचा विक्रम केला आहे.

भारताने नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्याच्या पहिल्याचा आठवड्यात लसीकरणात यशस्वी ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. तसेच १५० कोटी लसीचे डोस देण्याचा हा विक्रम भारताने वर्षभराच्या आत पूर्ण केला आहे. या यशाची माहिती देशाचे आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. लसीकरणातील हा टप्पा म्हणजे देशवासीयांच्या शक्तीचे प्रतिक असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

भारताने १०० कोटी लसींचे डोस देण्याच्या विक्रमाला २१ ऑक्टोबर २०२१ मध्ये गवसणी घातली होती. अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी वेळेत भारताने हा महत्त्वाचा टप्पा पार केला होता. १९ जानेवारी २०२१ रोजी भारतातील कोरोना विरोधातील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु झाली होती. अनेकदा भारताने एका दिवसात १ कोटी पेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम रचला होता. १७ सप्टेंबर २०२१ रोजी भारताने एका दिवसात तब्बल अडीच कोटी लसींच्या मात्रा देण्याचा विक्रम रचला होता.

हे ही वाचा:

‘काँग्रेसवाल्यांनो तुम्ही मोदीजींचे काहीही वाकडे करु शकणार नाहीत’

महिलेच्या केसात थुंकणाऱ्या जावेद हबीबचा माफीनामा

प्लास्टिक द्या आणि चहा, वडापाव घ्या!

‘हे तर पंजाबमधील बिघडलेल्या कायदा-सुव्यवस्थेचे लक्षण’

काही दिवसांपूर्वी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आपत्कालीन परिस्थितीमध्ये प्रौढांसाठी आणखी दोन कोरोना प्रतिबंधित लसींना मान्यता दिली. कॉर्बेव्हॅक्स (Corbevax), कोवोव्हॅक्स (Covovax) आणि अँटी-व्हायरल गोळी (Molnupiravir) याला मान्यता दिली आहे. तर वर्षाच्या सुरुवातीला १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मान्यता देण्यात आली आहे.

Exit mobile version