भारतात सध्या कोविड लसीकरण मोहीम फार जोमात सुरू आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. तर भारत या लसीकरण मोहिमेत नवनवीन विक्रमांना गवसणी घालताना दिसत आहे. सोमवार, १३ सप्टेंबर रोजी भारताने लसीकरणात ७५ कोटींपेक्षा अधिक लसी देण्याचा टप्पा ओलांडला आहे. भारताच्या या वेगवान लसीकरणामुळे सर्व भारतीय नागरिक ठरलेल्या वेळेत संपूर्णतः लसवंत होतील अशी आशा वर्तवली जात आहे.
या वेगाने भारत डिसेंबर पर्यंत ४३ टक्के जनतेचे लसीकरण पूर्ण करेल अशी भावना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केली आहे. तर भारताच्या या अनोख्या विक्रमाचा संबंध त्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाशी जोडला आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटरवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
हे ही वाचा:
संजय राऊतांचे अग्रलेख म्हणजे तालिबानी प्रवृत्तीचे उदाहरण
मुंबई ठाण्यात पुढील चार दिवस जोरदार पावसाचा अंदाज
हसन मुश्रीफ आणि कुटुंबियांनी असे केले शेकडो कोटींचे घोटाळे
देशात कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट, केरळमध्ये मात्र भयावह स्थिती
“अभिनंदन भारत! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका प्रयास’ या मंत्राने जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सातत्याने नवीन आयाम निर्माण करत आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात म्हणजेच स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात देशाने ७५ कोटी लसीकरणाचा आकडा पार केला आहे.” असे ट्विट मनसुख मांडवीय यांनी केले आहे.
Congratulations India! 🇮🇳
PM @NarendraModi के सबका साथ, सबका प्रयास के मंत्र के साथ विश्व का सबसे बड़ा टीकाकरण अभियान निरंतर नए आयाम गढ़ रहा है। #AazadiKaAmritMahotsav यानि आज़ादी के 75वें वर्ष में देश ने 75 करोड़ टीकाकरण के आँकड़े को पार कर लिया है।#SabkoVaccineMuftVaccine pic.twitter.com/BEDmQZQsY7
— Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) September 13, 2021