मोदींना वाढदिवशी ‘२ कोटींची’ भेट

मोदींना वाढदिवशी ‘२ कोटींची’ भेट

भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भारताने एक नवा विक्रम रचला आहे. कोविड लसीकरणाच्या बाबतीत भारताने हा विक्रम रचला असून हे करताना आपलाच जुना विक्रम मोडला आहे. भारताने आज संध्याकाळपर्यंतच दोन कोटी लसी देण्याचा विक्रम नोंदवला आहे. ही फक्त संध्याकाळी पाच वाजेपर्यंत देण्यात आलेल्या लसींची आकडेवारी असून रात्री पर्यंत ही आकडेवारी अजून किती वाढते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे. कोविद लसीकरणाच्या बाबतीत एका दिवसात सर्वाधिक लस देण्याचा हा विक्रम आहे.

कोविडच्या जागतिक महामारी विरोधात एकमेव कवच म्हणजे कोविड विरोधातील लस. गेली अनेक महिने भारतात जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू आहे. भरत या मोहिमेत नवनवीन विक्रम रचताना दिसत आहे. आजवर भारताने ३ वेळा एकाच दिवशी १ कोटी पेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम रचला आहे. तर आज त्याचाही पुढचा टप्पा भारताने साधला आहे.

हे ही वाचा:

बापरे! महाराष्ट्रातील २३ हजार महिला गायब

भारताची राजकीय संस्कृती बदलणारा नेता

महेंद्रसिंग धोनी आता करणार एनसीसीसाठी ‘बॅटिंग’

सेंट्रल व्हिस्टावरून मोदींनी धरले विरोधकांना धारेवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आज म्हणजेच शुक्रवार, १७ सप्टेंबर रोजी भारताने ऐतिहासिक लसीकरण करून दाखवण्याचा निर्धार केला होता. नरेंद्र मोदी यांची भारतीय जनता पार्टी तसेच अनेक राज्य सरकारे, महापालिका यांच्या मार्फत मोहीम आखण्यात आली होती. या साऱ्याचा एकत्रित परिणाम साधल्याने भारताने संध्याकाळपर्यंत दोन कोटी लस्सी देण्याचा विक्रमी टप्पा ओलांडला आहे. तर भारताचे एकूण लसीकरण हे ७८ कोटीच्या पार गेले. रात्री पर्यंत हा आकडा आणखीन वाढेल. कोविड विरोधात खंबीर पावले उचलत जगासमोर आदर्श घालून देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाढदिवशी ही एक अनोखी भेट ठरणार आहे.

Exit mobile version