भारताने कोरोना महामारीच्या विरोधातील लढाईत एक महत्वपूर्ण टप्पा ओलांडला आहे. भारताने १०० कोटी लसींचे डोस देण्याच्या विक्रमला गवसणी घातली आहे. भारताच्या या कामगिरीचा सर्वानाच अभिमान असून या कामगिरीसाठी सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे.
सरकारी यंत्रणा, कोरोना योद्धे या सर्वांच्या एकत्रित कामगिरीमुळे भारताने अवघ्या ९ वाहिन्यांच्या विक्रमी वेळेत हा महत्वाचा टप्पा पार केला आहे. १९ जानेवारी रोजी भारतातील कोरोना विरोधातील जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहिम सुरु झाली. तर आज भारताने १०० कोटी लसीच्या मात्रा देण्याच्या महत्त्वाच्या विक्रमला गवसणी घातली आहे. या प्रवासात अनेकदा भारताने एक दिवसात एक कोटी पेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम रचला तर. १७ सप्टेंबर रोजी भारताने एका दिवसात तब्बल अडीच कोटी लसींच्या मात्रा देण्याचा विक्रम रचला होता.
या लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात फक्त कोरोना योद्ध्यांना लस देण्यात आली. तर त्या नंतर जेष्ठ नागरिक, ४५ वयाच्या वरचे नागरिक, १८-४५ वयोगटातील नागरिक असे टप्प्या टप्प्याने सर्वांसाठी लसीकरण खुले करण्यात आले. लवकरच आता १८ वर्षाखालील मुलांचेही लसीकरण सुरु होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकरत भारतातील १०० टक्के नागरिक लसवंत होतील अशी अपेक्षा केली जात आहे.
हे ही वाचा:
सहकारी साखर कारखान्यांना मिळणार नवसंजीवनी
बापरे! डॉक्टरांनी ‘किडनी स्टोन’ ऐवजी ‘किडनी’च काढली
काँग्रेसच्या नव्या नियुक्त्यांत पटोले समर्थकांचे ‘लोंढे’; सचिन सावंतांचा नाराजीनामा
भारतातील एकूण लोकसंख्येच्या जवळपास ७४% किंवा जवळजवळ तीन-चतुर्थांश लोकांना किमान एक डोस मिळाला आहे. तर ३०% लोकांना दोन्ही डोस मिळाले आहेत. लहान लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये कोविड -१९ लसीकरणाचे प्रमाण हे उल्लेखनीय आहे. सिक्कीम, हिमाचल प्रदेश, गोवा आणि जम्मू -काश्मीर, लडाख, चंदीगड आणि लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशांमध्ये, १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक व्यक्तीला आधीच लसीचा किमान एक डोस मिळाला आहे. दोन्ही डोस घेतलेले आरोग्य सेवक ८७ ,८३,६६५ इतके आहेत. तर लक्षद्वीप, सिक्कीम आणि लडाखच्या बाबतीत प्रत्येकी ४०% पेक्षा जास्त नागरिकांचे लसीकरण झालेले आहे.