एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक

एका दिवसात एक कोटी लसीकरणाची भारताची हॅटट्रिक

मल्टी नॅशनल कंपन्या भारतात स्थापन करण्याची वेळ- पंतप्रधान नरेंद्र मोदी कोविड-१९ च्या २ लशी भारतीय कंपन्यांनी बनवल्यावरचे विधान.

भारतात सध्या कोविड लसीकरण मोहीम फार जोमात सुरू आहे. जगातील ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम आहे. तर भारत या लसीकरण मोहिमेत नवनवीन विक्रमांना गवसणी घालताना दिसत आहे. सोमवार, ६ सप्टेंबर रोजी भारताने पुन्हा एकदा एका दिवसात एक कोटी पेक्षा अधिक लसी देण्याचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या ११ दिवसात भारताने तिसऱ्यांदा ही कामगिरी करून दाखवली आहे. भारताच्या या वेगवान लसीकरणामुळे सर्व भारतीय नागरिक ठरलेल्या वेळेत संपूर्णतः लसवंत होतील अशी आशा वर्तवली जात आहे.

सोमवार, ६ सप्टेंबर रोजी भारताने एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लसीकरण करण्याची हॅट्ट्रिक साधली आहे. सोमवारच्या लसीकरणाच्या आकडेवारी नुसार सोमवारी भारताने १,०५,७६,९११ इतक्या लसी दिल्या. तर हा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. देशातील लसीकरणाचा एकूण आकडा हा ६८ कोटी ७५ लाखाच्याही पुढे गेला आहे.

हे ही वाचा:

भारतीय गोलंदाजीसमोर इंग्लंड ढेपाळला! भारताला २-१ आघाडी

सिरीया, इराकमधून आलेल्या शेजाऱ्यांनी त्याला बनवले अतिरेकी

लोकप्रिय कलाकार घेतायत ८० हजार ते दीड लाख रोज

गर्भवती महिलेला तालिबान्यांनी कुटुंबासमोर घातल्या गोळ्या

या कामगिरीसाठी देशभरातून भारत सरकार वर कौतुकाचा वर्षाव होताना दिसत आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी या कामगिरीबाबत समाधान व्यक्त केले आहे. ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदींनी तर नेहमीप्रमाणे आपल्या अनोख्या शैलीत क्रिकेटच्या मैदानावर झालेला भारताचा विजय आणि लसीकरण मोहिमेत भारताने केलेली कामगिरी यांची सांगड घातली आहे.

‘पुन्हा एकदा एक उत्तम दिवस! लसीकरणाच्या मोहिमेतही आणि क्रिकेटच्या मैदानातही नेहमीप्रमाणेच भारतीय संघ जिंकला आहे’ असे ट्विट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

तर आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय असे म्हणतात की ‘भारताने आज पुन्हा एकदा लसीकरणाचा एक कोटींचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्याची सुरुवात फारच चांगली झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतात सुरू असलेली जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही नवी उंची गाठत आहे.’

Exit mobile version