कोविड महामारीच्या विरोधातील जगातली सर्वात मोठी लसीकरण मोहीम ही सध्या भारतात सरू आहे. भारत सातत्याने या मोहिमेत नवनव्या विक्रमांना गवसणी घालताना दिसत आहे. भारताने सोमवार, २७ सप्टेंबर रोजी पुन्हा एकदा एका दिवसात एक कोटी पेक्षा अधिच लसी देण्याचा विक्रम केला आहे. भरताने आत्तापर्यंत तब्बल पाच वेळा हा अनोखा विक्रम केला आहे. यातुन भारताचे लसीकरणाच्या बाबतीतले सातत्य दिसून येते.
भारताने कोविड विरोधातील लढ्याच्या अनुषंगाने जगासमोर आदर्ष घालून दिला आहे. लसीकरण मोहीमेच्या बाबत जगभरातून भारताचे कौतुक होताना दिसत आहे. भारताने आजवर तब्बल पाच वेळा एका दिवसात एक कोटीपेक्षा अधिक लसी देण्याचा विक्रम करून दाखवला आहे. या पैकी १७ सप्टेंबर रोजी झालेल्या लसीकरणात तर भारताने एका दिवशी तब्बल २.५ कोटी पेक्षा अधिक लसी देत जागतिक विक्रम नोंदवला आहे.
हे ही वाचा:
भारत-तैवानमधील ‘हा’ करार वाढवतोय चीनची चिंता
आज जागतिक नदी दिवस; पण मुंबईतील नद्या मरणपंथाला!
‘लिफ्ट करा दे’ च्या नादात अखिलेश यांची पोलखोल
भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. भारताचे आरोग्य मंत्री मनसुख मांडवीया यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. “राष्ट्राचे अभिनंदन, आपण पुन्हा एकदा एका दिवसात १ कोटी कोविड लसीचे डोस दिले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने कोरोनाला एक ‘पंच’ दिला आहे. एका दिवसात १ कोटी लसी देण्याचा विक्रम भारताने पाचव्यांदा साध्य केला आहे.” असे मांडवीया यांनी म्हटले आहे.