बांगलादेशात सार्वत्रिक निवडणुकीला सुरुवात झाली आहे.बांगलादेशमध्ये हिंसाचारच्या पार्श्वभूमीवर मतदान होत आहे.रविवारी सकाळी ८ वाजता मतदानाला सुरुवात झाली.पंतप्रधान शेख हसीना यांनी आज सकाळी मतदान केले.यानंतर त्यांनी भारताचे भरभरून कौतुक केले.दरम्यान, निवडणुकीवर बहिष्कार टाकत हल्लेखोरांनी आतापर्यंत सुमारे १७ मतदान केंद्रे पेटवून दिली आहेत.
बांगलादेशाच्या पंतप्रधान हसीना शेख यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.मतदान केंद्रातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी भारताचे कौतुक केले.म्हणाल्या की, आम्ही खूप भाग्यवान आहोत की, आमच्याकडे भारतासारखा विश्वासू मित्र आहे.स्वातंत्र्ययुद्धात त्यांनी आम्हाला साथ दिली.१९७५ नंतर आम्ही आमचे कुटुंब गमावले तेव्हा भारताने आम्हाला आश्रय दिला.भारतातील जनतेला आमच्या शुभेच्या, असे शेख हसीना म्हणाल्या.
हे ही वाचा:
अयोध्येत जमिनींना चढला भाव; किंमती चारपट वाढल्या
महाराष्ट्रात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या ३ बांगलादेशी नागरिकांना अटक!
चेहऱ्यावर हसू अन हातावर ‘श्री राम टॅटू’!
पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!
बांगलादेशच्या निवडणूक आयोगानुसार रविवारी ४२,००० हुन अधिक मतदान केंद्रावर होणाऱ्या मतदानात एकूण ११.९६ कोटी नोंदणीकृत मतदार मतदानाचा हक्क बजावतील.२७ राजकीय पक्षांचे १,५०० हुन अधिक उमेदवार निवडणूक लढवत आहेत आणि त्यांच्याशिवाय ४३६ अपक्ष उमेदवारही आहेत.भारतातील तीन निरीक्षकांसह १०० हुन अधिक परेदशी निरीक्षक १२ व्या सार्वत्रिक निवडणुकांवर लक्ष ठेवतील.पोलिसांच्या कडेकोट बंदोबस्तात ही निवडणूक होत आहे.८ जानेवारीला सकाळपासून निकाल अपेक्षित असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
दरम्यान, बांग्लादेशातील माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांग्लादेश नॅशनलिस्ट पार्टी ( बीएनपी) विरोधी पक्षाने या निवडणुकीवर बहिष्कार घालत आहे.शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा आणि त्यानंतर निष्पक्ष निवडणुक घ्यावी, असे बीएनपीने म्हटले होते.बांग्लादेशात गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत.सार्वत्रिक निवडणुकांवर बहिष्कार टाकत शनिवारी मतदानापूर्वीच अनेक मतदान बूथ जाळण्यात आले. तसेच अनेक ठिकाणी शाळा देखील जाळण्यात आल्या.बांग्लादेशातील ही १२वी सार्वत्रिक निवडणूक आहे.पंतप्रधान शेख हसीना पुन्हा या पदाच्या दावेदार आहेत.