भारतात यावर्षी तब्बल २०२ वाघांचा मृत्यू झाला आहे.ही संख्या एका दशकातील सर्वात जास्त आहे.ऑल-इंडिया टायगर एस्टिमेशन (AITE)-२०२२ नुसार, प्रोजेक्ट टायगरला ५० वर्षे पूर्ण झाली आणि देशात एकूण ३,६८२ वाघ आहेत.
वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडिया (WPSI) ही एक वन्यजीव संरक्षण संस्था आहे, जी वाघ आणि बिबट्याच्या मृत्यूंवर लक्ष ठेवते.या संरक्षण संस्थेने एक अहवाल जारी केला.या अहवालानुसार १ जानेवारी ते २४ डिसेंबर २०२३ या कालावधीत भारताने २०२ वाघ गमावले आहेत.ऑल-इंडिया टायगर एस्टिमेशन (AITE)-२०२२च्या अहवालानुसार भारतातील जंगलात ३,६८२ वाघ आहेत.वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाने जारी केलेल्या २०२ वाघांच्या मृत्यूमध्ये १४७ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला आहे तर ५५ वाघांचा मृत्यू शिकारीमुळे झाल्याचे अहवालात सांगितले आहे.
गेल्या वर्षी, १०४ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे झाला होता तर शिकारीमुळे ३९ वाघ दगावले होते. ही संख्या एका दशकातील सर्वात जास्त असल्याचे अहवालातून सांगण्यात आले आहे.वाइल्डलाइफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रात सर्वाधिक वाघांची मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, यावर्षी महाराष्ट्रात ५२ वाघांचा मृत्यू झाला आहे.जवळजवळ ५० टक्के मृत्यू चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात झाले आहेत.सर्वात जास्त वाघ मध्य प्रदेशात आहेत. मध्य प्रदेशात ऐकून ४७ वाघांचा मृत्यू असून, वाघांच्या मृत्युदरांमध्ये महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर तर मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हे ही वाचा:
चोर घोड्यावरून आले, पण कुत्र्यांनी पळवून लावले!
अटल.. अचल.. अविचल.. अटल बिहारी वाजपेयी यांना पंतप्रधान, गृहमंत्र्यांकडून आदरांजली
जयपूर; १४ वर्षीय शाळकरी मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू!
पराभवानंतर प्रियंका गांधी उत्तर प्रदेशात फिरकल्याच नाहीत
२०१२ पासून देशातील वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीत वाढ झाली आहे. २०१९ मध्ये ९६, २०२० मध्ये १०६, २०२१ मध्ये १२७, २०२२ मध्ये १२१ मृत्यूंवरून हा आकडा वाढून या वर्षी २०२ झाला आहे.टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, वाघांच्या संख्येत अभूतपूर्व वाढ होत असली तरी गेल्या पाच वर्षांत तितक्याच वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात वाघांच्या मृत्यूची दोन प्रमुख कारणे शिकार आणि विजेचा शॉक आहे,” असे राज्य वन्यजीव मंडळाचे (SBWL) माजी सदस्य बंडू धोत्रे यांनी सांगितले.
डब्लूपीएसआयच्या मते, देशात बिबट्याच्या मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ झाली आहे.यावर्षी १ जानेवारी ते २४ डिसेंबरपर्यंत किमान ५४४ बिबट्यांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.यामध्ये ५४४ पैकी १५२ बिबट्याना शिकाऱ्यानी मारले आहेत.
दरम्यान, जोपर्यंत वाघांची संख्या वाढत आहे तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही, असे तज्ज्ञांचे मत आहे.“वाघांची संख्या झपाट्याने वाढली आहे. जंगलातील सरासरी वय फक्त १०-१२ वर्षे आहे आणि वाघांमध्ये ५० टक्के नवजात मृत्यू सामान्य आहे. जोपर्यंत दरवर्षी ६ टक्के लोकसंख्या वाढ नोंदवली जात आहे, तोपर्यंत काळजी करण्याचे कारण नाही. वाघांची संख्या जास्त असलेल्या राज्यांमध्ये सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे,” असे एसपी यादव, अतिरिक्त महासंचालक (प्रोजेक्ट टायगर) आणि एनटीसीए सदस्य-सचिव, यांनी टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितले.