इंडी आघाडीच्या बैठकीत काही ठोस निर्णय नाही

 केवळ चहा, बिस्कीटावर बैठक आटोपली, जदयुचे खासदार सुनील कुमार पिंटू यांचे स्पष्टीकरण

इंडी आघाडीच्या बैठकीत काही ठोस निर्णय नाही

इंडी आघाडीत कोणताही निर्णय झाला नसल्यामुळे हि बैठक पूर्णतः अपयशी झाली आहे. या बैठकीत काही ठोस निर्णयाची आवश्यकता होती मात्र तसा कोणताही निर्णय या बैठकीत झाला नाही. केवळ चहा बिस्कीटावर हि बैठक पार पडली. साधा सामोसासुद्धा या बैठकीत ठेवण्यात आला नव्हता. आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्यामुळे कॉंग्रेस पक्षाने मदत करण्यासाठी १३८, १३८० आणि १३८०० रुपयांचे योगदान देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे शाही थाटात पार पडणाऱ्या इंडी आघाडीच्या बैठका काल केवळ चहा बिस्कीटावर आटोपत्या घ्याव्या लागल्या, असे जनता दल युनायटेडचे खासदार सुनील कुमार पिंटू यांनी बुधवारी सांगितले.

हेही वाचा..

कंगना रनौत लोकसभेच्या मैदानात उतरणार

लोकसभेच्या आणखी दोन खासदारांचे निलंबन; निलंबित खासदारांची संख्या १४३

पुजाऱ्याच्या हत्येचे कारण झाले स्पष्ट…

पंजाबचा गँगस्टर अमृतपाल सिंगला पोलिसांनी घातल्या गोळ्या, दोन पोलीस जखमी!

मंगळवारी इंडी आघाडीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत जागा वाटप, पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरेल अशी चर्चा होती. मात्र तसे काहीच घडले नाही. सुरुवातीला ६ डिसेंबरची तारीख निश्चित केली होती. मात्र ममता बॅनर्जी, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या अनुपलब्धतेमुळे बैठक पुढे ढकलण्यात आली होती ति मंगळवारी पार पडली.

या बैठकीत पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचे नाव प्रस्तावित करण्यात आले मात्र खर्गे या प्रस्तावाला नकार दिला आहे. विरोधकांनी आधी निवडणूक जिंकण्यावर भर द्यायला हवा, असे इंडी आघाडीच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार तृणमूल काँग्रेस पक्ष आणि इतर अनेक आघाडीच्या भागीदारांनी जागावाटप चर्चेसाठी ३१ डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवली आहे.

 

Exit mobile version