‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

‘इंडी’ आघाडी पत्रकारांवरील बहिष्कार मागे घेणार?

भाजपविरोधात लढण्यासाठी स्थापन झालेल्या ‘इंडी’ आघाडीने १४ पत्रकारांवर बहिष्कार घालण्याची घोषणा केल्यानंतर गदारोळ माजला आहे. भाजपने तर या बहिष्काराला आणीबाणी म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे हा बहिष्कार मागे घेतला जाईल का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

 

काँग्रेसचे नेते पवन खेरा यांनी शनिवारी तसे संकेत दिले. त्यांनी इंडी आघाडीने पत्रकारांवर बहिष्कार टाकलेला नाही, तर हे एकप्रकारे असहकार आंदोलन असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. ‘काहीच कायमस्वरूपी नसते. भविष्यात या पत्रकारांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली तर ‘इंडी आघाडी’चे नेते त्यांच्या कार्यक्रमात जाण्यास सुरुवात करतील,’ असे त्यांनी सांगितले आहे.

 

काँग्रेस कार्यकारिणी समितीची बैठक दोन दिवसांवर आली असताना पवन खेडा यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे. याआधीही अशा प्रकारे पत्रकारांवर बहिष्कार घालण्याच्या कृतीचे ‘इंडी आघाडी’मधील काही नेत्यांनी समर्थन केले नव्हते, अशीही बाब उघड झाली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात ‘ नमो ११ कलमी कार्यक्रम’ राबवणार

भारतीय मसाल्यांबाबतचे जगभरात असलेले आकर्षण पुन्हा निर्माण करा

देशात २३ नव्या सैनिकी शाळा उभारणीला मान्यता

२० लाखांच्या कथित लाचप्रकरणी सीबीआयकडून सात जण अटकेत

‘ते पत्रकार आमचे शत्रू नाहीत. प्रसारमाध्यमातील या व्यक्तींचा आम्ही तिरस्कार करत नाही. त्यांची स्वत:ची मजबुरी असू शकते. तसेच, काहीच कायमस्वरूपी नसते. जर उद्या त्यांना जाणीव झाली की, जे काही ते करत होते ते त्यांचा देश, समाजासाठी चांगले नव्हते, तर आम्ही त्यांच्या कार्यक्रमांना जाण्यास सुरुवात करू. याला बहिष्कार म्हणू नका. जर कोणी रस्त्यावर कचरा फेकला असेल, तर तो टाळून दुसऱ्या मार्गाने जाणे हे प्रत्येकाचे स्वातंत्र्य आहे. तूर्त आम्ही हेच करतोय,’ असे पवन खेरा म्हणाले.

Exit mobile version