राज्यात मतदान सुरु असताना बीड विधानसभा मतदारसंघातून एक दुर्दैवी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. बीड विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार बाळासाहेब शिंदे यांचा मतदान केंद्रावरच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबात शोककळा पसरली असून कार्यकर्त्यांना मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाळासाहेब शिंदे बीड शहरातील छत्रपती शाहू विद्यालयात असणाऱ्या मतदान केंद्रावर थांबले होते. यावेळी त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर, कार्यकर्त्यांनी त्यांना तात्काळ बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. तेथून पुन्हा त्यांना छत्रपती संभाजी नगर येथील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. दरम्यान, या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सातारा जिल्ह्यात देखील तशीच एक घटना घडली आहे. शाम धायगुडे यांना मतदान करतानाचा हृदयविकाराचा झटका आला आणि त्यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यातील खंडाळ्यातील मोरवे गावात ही धक्कादायक घटना घडली.
हे ही वाचा :
वांगी ते बिटकॉईन एक चित्तथरारक प्रवास…
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कराळे सराला मारहाण!
बिटकॉइन घोटाळा: सुप्रिया सुळेंनी उल्लेख केलेल्या गौरव मेहताच्या घरी ईडीकडून धाड
हर्षित माहिमकर, प्रिशा शाहला दुहेरी मुकुट