22 C
Mumbai
Tuesday, December 24, 2024
घरविशेषस्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगांच्या अभिवाचनातून साजरा झाला 'अमृतमहोत्सव'

स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगांच्या अभिवाचनातून साजरा झाला ‘अमृतमहोत्सव’

सावरकर राष्ट्रीय स्मारकात पार पडला सोहळा

Google News Follow

Related

आज देशभरात स्वातंत्र्याचा अमृत ​​महोत्सव साजरा केला जात आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथेही दिमाखात स्वातंत्र्यदिन सोहळा पार पडला. यावेळी भारतीय वायू सेनेचे ग्रुप कॅप्टन निलेश देखणे, चित्रपट लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, अभिनेते तुषार दळवी, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, कोषाध्यक्ष मंजिरी मराठे, कार्यवाह राजेंद्र वराडकर यासह आईंक मान्यवर उपस्थित होते.

या स्वातंत्र्याच्या कार्यक्रमात क्रांतिकारकांनी घडवलेल्या जाज्वल्यपूर्ण इतिहासाची साक्ष देणारी गाणी, नृत्य आणि स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगांचे अभिवाचन तसेच मुरबाड येथील महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची साहसी प्रात्यक्षिके सादर केली.

अभिनेता तुषार दळवी यांनी स्वातंत्र्यसैनिक सावरकरांनी सांगितलेल्या तिरंग्याचे महत्त्व मांडले. स्वातंत्र्यसैनिक सावरकरांनी तिरंग्याला विरोध केल्याची अफवा पसरवतात. मात्र, सावरकरांनी त्यांच्या लेखणीतून तिरंग्यातील तीन रंगांचा प्रत्येक भाग समजावून सांगितला असल्याचे तुषार दळवी यांनी सांगितले.

यावेळी ग्रुप कॅप्टन नीलेश देखणे यांनी स्वातंत्र्यसैनिकांसह देशाच्या रक्षणासाठी सीमेवर लढणाऱ्या जवानांचा गौरव केला. यावेळी ते म्हणाले, पालकांनी आपल्या मुलांना क्रांतिकारक, शहीद सैनिकांच्या कथा सांगाव्यात जेणेकरून ते पुढची पिढी घडवू शकतील. या सर्वांमुळे मुलांना वेगळी प्रेरणा मिळेल आणि लहान वयातच त्यांच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण होईल, असे निलेश देखणे यांनी सांगितले.

हे ही वाचा:

भ्रष्टाचार, घराणेशाहीवर राहुल गांधींची बोलती बंद

पुलवामात दोन दहशतवाद्यांना टिपणाऱ्या देवेंद्र प्रताप सिंह यांना कीर्ती चक्र

‘भ्रष्टाचार आणि घराणेशाही नष्ट करू’

विधान परिषद आमदारकी फुटकळ आहे का ?

अभिनेते,दिगदर्शक दिग्पाल लांजेकर यांनी लेखिका मृणालिनी जोशी यांच्या ‘इन्कलाब’ या भगतसिंग यांच्या चरित्रातील एक प्रसंग सादर केला. तसेच देशभक्तीपर गीते गायकांनी सादर केली. नृत्यांगना पूर्वा भावे, दिशा देसाई यांनी नृत्याविष्कार सादर केला. यासोबतच महाराष्ट्र मिलिटरी स्कूल, मुरबाडच्या विद्यार्थ्यांनी विविध साहसी खेळ सादर केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा