दरवर्षी प्रमाणे यंदाही ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात’, ‘स्वातंत्र्यदिन’ उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.सकाळी ८:३० वाजता ध्वजारोहण होणार आहे. वरिष्ठ लष्करी अधिकारी कर्नल (निवृत्त)नरेंद्रनाथ सूरी हे प्रमुख पाहुणे असणार आहेत. यानंतर महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून पथसंचलन करण्यात येणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे ७७ व्या स्वातंत्र्यदिनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.सकाळी ८:३० वाजता ध्वजारोहण होणार आहे.या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल(निवृत्त) नरेंद्रनाथ सूरी असणार आहेत.यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्यकारी संचालक रणजित सावरकर, राजेंद्र वराडकर, सहकारी स्वप्नील सावरकर यांच्यासह सभासद व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात महाराष्ट्र मिलिटरी स्कूल,तळवली, मुरबाड येथील विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजाला वंदन करण्यात येणार असून, त्यानंतर छत्रपती शिवाजी मार्गाच्या प्रांगणात या विद्यार्थ्यांकडून पथसंचलन करण्यात येणार आहे.
हे ही वाचा:
इराणमधील प्रमुख शिया धार्मिक स्थळावर गोळीबार
फाळणी अर्थात ‘विभाजन विभिषिका दिनी’ स्मरण !
शिमल्यात भूस्खलन, शिव मंदिर कोसळून ९ जणांचा मृत्यू !
सुशील कुमारचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण
मॅरेथॉन रक्तदान
७७ व्या स्वातंत्र्य दिनासोबतच स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले आहे.स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, टाटा हॉस्पिटल आणि मुंबई अल्ट्रा यांच्या संयुक्त विद्यमाने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान मॅरेथॉन सकाळी ८ पासून रात्री ८ पर्यंत चालू राहणार आहे.
७७ वा ध्वजारोहण समारोह
वेळ : सकाळी ८:३० वाजता
स्थळ : स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर