टी -२० विश्वचषक २०२४ ची सुरुवात लवकरच होणार असून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.१ ते २९ जून दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे.ही स्पर्धा विशेष असणार आहे, कारण टी -२० विश्वचषक स्पर्धेत प्रथमच २० संघ सहभागी होणार आहेत.या स्पर्धेतील पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात होणार आहे, मात्र सर्वांच्या नजरा भारत-पाकिस्तान सामन्यावर असणार आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याच्या तिकिटांची किंमत लाखांमध्ये जात आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ९ जून रोजी न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.एबीपी हिंदीच्या बातमीनुसार, भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्याचे सर्वात स्वस्त तिकीट यूएस चलनात $ २,५०० इतके आहे.जर याचे भारतीय चलनात रूपांतरित केले तर ही रक्कम २ लाख रुपयांच्या वर जाते.समजा एका कुटुंबातील अथवा मित्र मंडळातील ५ लोक भारत-पाकिस्तान सामना पाहण्यासाठी अमेरिकेत गेले तर त्यांना सुमारे $१०,००० चे बजेट ठेवावे लागेल. १० हजार डॉलर्स म्हणजे जवळपास ८४ लाख रुपयांमध्ये त्यांना एक सामना पाहायला मिळेल.तर पाकिस्तानचा एक व्यक्ती जर भारत-पाकिस्तान सामना बघण्यासाठी अमेरिकेला केला तर त्याला तब्बल ६९ लाखांपेक्षा अधिक रक्कम द्यावी लागणार आहे.
हे ही वाचा:
भारत जोडो यात्रेत राहुल गांधी यांना भेटण्यासाठी पैसे मागितले!
ममता म्हणतात, ‘तृणमूल इंडी आघाडीचा भाग’, पण काँग्रेसला विश्वास नाही!
अतिक्रमण विभागाच्या कर्मचाऱ्यांना लष्करी गणवेश, वाद वाढताच महापालिकेचा यू-टर्न!
होर्डिंग दुर्घटना प्रकरणाचा तपास मुंबई गुन्हे शाखेकडे
काही आठवड्यांपूर्वी एक रिपोर्ट समोर आला होता ज्यामध्ये भारत-पाक सामन्याचे सर्वात महागडे तिकीट १.८६ कोटी रुपयांना विकले जात असल्याचा दावा करण्यात आला होता. २०२३ च्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकातील भारत-पाकिस्तान सामन्याचे सर्वात महागडे तिकीट ५७.१५ लाख रुपयांना विकले गेले होते.