भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आजपासून अंतिम टप्प्यात पोहचली आहे. आज मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना सुरु होत आहे. हा सामना भारत जिंकल्यास मालिका भारताच्या नावावर होईल आणि इंग्लंड जिंकल्यास मालिका अनिर्णीत सुटू शकते. याचे कारण पहिला सामना अनिर्णीत सुटल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात दिमाखदार विजय मिळवला. पण तिसरा सामना इंग्लंडने जिंकत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. पण चौथा सामना भारताने जिंकत मालिकेत २-१ ची आघाडी घेत मालिका गमावण्यापासूनही स्वत:चा बचाव केला आहे. आता पाचवा सामना भारत जिंकला किंवा अनिर्णीत सुटला तरी भारत २-१ ने मालिका जिंकेल. दुसरीकडे इंग्लंड सामना जिंकल्यास मालिका २-२ ने ड्रॉ होईल त्यामुळे भारताची मालिका गमावण्याची शक्यता संपली आहे.
भारतीय संघाचा विचार करता संघात तसा कोणताच बदल होणे शक्य नाही. मात्र भारताचा दिग्गज दौऱ्यातील सर्वात यशस्वी फलंदाज रोहित शर्मा दुखापतीमुळे चौथ्या सामन्यात क्षेत्ररक्षण न करता तंबूत विश्रांती करत होता. रोहितच्या गुडघ्याला थोडी दुखापत असल्याने त्याच्यावर उपचार सुरु होते. त्यामुळे त्याची दुखापत अजून ठिक झाली नसल्यास तो सामन्याला मुकू शकतो. त्याच्याजागी मयांक अगरवाल किंवा पृथ्वी शॉला संधी दिली जाऊ शकते. तर इंग्लंडच्या संघात शक्यतो बदल होणार नाही.
हे ही वाचा:
तालिबानच्या कब्जानंतर राशिद खानचा राजीनामा
चमच्याने बोगदा खणून कैदेतून सुटका
इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची मुदत वाढवली
महिला पोलिस शिपायानेच काढला आपल्या पोलिस सहकाऱ्याचा ‘काटा’
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा कसोटी सामना शुक्रवारी १० सप्टेंबर रोजी मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफोर्ड मैदानात खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता सुरू होणार असून ३ वाजता नाणेफेक करण्यात येईल. हा कसोटी सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होणार आहे.