ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार कर्णधार!

विझाग येथे २३ नोव्हेंबरपासून मालिकेची सुरुवात

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी सूर्यकुमार कर्णधार!

२३ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी सूर्यकुमार यादव याची भारताचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाली आहे. मालकेतील तिसऱ्या सामन्यानंतर श्रेयस अय्यर हा संघात पुनरागमन करणार असून तो उपकर्णधाराची धुरा सांभाळेल, अशी शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० मालिकेसाठी भारताने १५ खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. ही मालिका विझाग येथे २३ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या टी२० संघाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक पांड्याला विश्वचषक २०२३ स्पर्धेदरम्यान दुखापत झाली होती. तो अजूनही दुखापतीतून सावरत आहे.

त्यामुळेच सूर्यकुमार यादवला कर्णधारपद भूषवण्याची संधी मिळत आहे. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याची ही पहिलीच संधी आहे. सध्या टी २० प्रकारात आयसीसीच्या क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या सूर्यकुमार यादवने आयपीएलच्या २०२३ हंगामात कर्णधारपदाची धुरा सांभाळली होती.

या वर्षी आयर्लंडच्या दौऱ्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा डावखुरा फलंदाज रिंकू सिंह याचीही टी २० संघात निवड झाली आहे. तसेच, तिलक वर्मा आणि यशस्वी जयस्वाल या दोघांनीही भारतीय संघात पुनरागमन केले आहे.
भारतीय विश्वचषक संघाचा सदस्य असणारा श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी२० संघात चौथ्या सामन्यापासून सहभागी होईल. पहिल्या दोन सान्यात ऋतुराज गायकवाड उपकर्णधारपद भूषवेल.

हे ही वाचा:

वायू प्रदूषणाप्रकरणी मुंबई पोलिसांकडून बिल्डरविरोधात गुन्हा दाखल

इस्रायलकडून लष्कर-ए-तैयबा दहशतवादी संघटना म्हणून घोषित!

‘मायक्रोसॉफ्टमध्ये काम करण्यास मी खूप उत्सुक’

अबब!! १९२६ सालच्या दुर्मिळ मॅकलन व्हिस्कीसाठी मोजले २.७ मिलियन डॉलर्स

ही मालिका म्हणजेच टी २० विश्वचषक स्पर्धेसाठी पूर्वतयारी मानली जात आहे. पुढील वर्षी वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत ही विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे.भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला टी २० सामना गुरुवारी विशाखापट्टणम येथेली डॉ. व्हाय. एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडिअमवर रंगेल. तर, त्यानंतरचे सामने थिरुवनंतपूरम, गुवाहाटी, नागपूर आणि हैदराबाद येथे अनुक्रमे २६ नोव्हेंबर, २८ नोव्हेंबर, १ डिसेंबर आणि ३ डिसेंबर रोजी रंगतील.

टी २० मालिकेसाठी असा आहे भारताचा संघ

सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जयस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंह, जितेश शर्मा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, अक्सर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्णोई, अर्शदीप सिंग, प्रसिध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार, श्रेयस अय्यर (शेवटच्या दोन सामन्यांसाठी)

Exit mobile version