रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्यांच्या पोटात खड्डा!

सद्यस्थितीमध्ये मुंबईमध्ये तुम्ही रस्तामार्गे कुठे जात असाल तर जरा जपूनच. रस्ते दिसतच नाही इतके खड्डे जागोजागी पडलेले आहेत. पावसाळा सुरू झाल्यावर काही दिवसांतच रस्त्यांवर जागोजागी खड्डे दिसू लागले आहेत. एकूणच काय तर रस्त्यांचे काम नीट न झाल्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात खड्डे हे पडतातच. महापालिकेकडून अजूनही हे खड्डे बुजवण्याच्या कामाममध्ये होत असलेली दिरंगाई आता वाहनचालकांच्या जीवावर बेतणारी आहे.

खड्डे असताना त्यातून वाहने हाकणे आता अतिशय जिकीरीचे झालेले आहे. मुख्य म्हणजे हे खड्डे भरण्यासाठी डांबरचा वापर करण्यात येत आहे. पावसामुळे हे डांबर लगेच वाहून जात असल्याने खड्डे जसेच्या तसेच आहेत. त्यामुळे आता वाहनचालकांनी रस्त्यात खड्डा की खड्डयांत रस्ता अशी शेरेबाजी सुरू केलेली आहे.

हे ही वाचा:
ठाकरे सरकारने काढली लोकशाही मूल्यांची प्रेतयात्रा

भास्कर जाधव नरकासूर, तर उद्धव ठाकरे सोंगाड्या

ठाकरे सरकार, आता तरी लोकलमध्ये शिरू द्या!

एमपीएससीचे विद्यार्थी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक

यंदा तर केवळ मुंबईतच नव्हे तर ठाणे, नवी मुंबई महापालिका आणि अन्य महापालिका, नगरपालिका, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एमएमआरडीए आणि एमएसआरडीसीच्या हद्दीतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्यामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे.
मुंबईतले खड्डे सुद्धा अनेकांसाठी सोन्याचे अंडे देणारी कोंबडी आहे. खड्डे बुजवणे हे भ्रष्टाचाराचे कुरण बनले आहे.

खड्डे बुजवताना माया जमवण्यासाठी कंत्राटदार निकृष्ट प्रतीचा माल वापरून वेळ मारून नेतो. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला मात्र अनेक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. बाईकस्वारांना तर पाठदुखीमुले त्रस्त व्हायची वेळ आलेली आहे. डांबर, सिमेंट ऐवजी मुरूम माती टाकून तात्पुरते खड्डे कसे तरी बुजवतात. विविध कारणांनी रस्ते पुन्हा खोदतात. नंतर त्यावर माती टाकून खड्डे बुजवल्याचा डांगोरा पिटतात. ३१ मे नंतर रस्त्यावर खोदकाम होऊ नये असा नियम असतानाही रस्त्यांवर अनेक खोदकामे होताना दिसतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक त्रस्त झाले आहेत.

Exit mobile version