उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम तैनात!

एसआयडीच्या गोपनीय रिपोर्ट्सनंतर सुरक्षा अलर्टमोडवर

उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ, फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम तैनात!

भाजपाचे प्रमुख नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या नागपुरातील खाजगी निवासस्थानी फोर्स वनच्या १२ जवानांची अतिरिक्त टीम सुरक्षेसाठी तैनात करण्यात आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या निवासस्थानी भेटीसाठी येणाऱ्यांची चौकशी-तपासणी केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार-पाच दिवस अगोदर पासून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. घरासमोरील रस्त्यावर देखील बेरिकेट लावण्यात आले आहेत. नागपूर पोलिसांसह आता फोर्सवनची टीम देखील निवासस्थानी तैनात आहे.

हे ही वाचा : 

बंदी नंतरही फटाके फोडल्याने दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली

दीपोत्सवाला विरोध करणाऱ्या ठाकरे गटाने ईदसाठीच्या हिरव्या कंदिलाला विरोध केला असता का?

छत्रपती संभाजी नगरमध्ये कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त

“भारत आपल्या सीमेच्या एक इंच भागाचीही तडजोड करू शकत नाही”

डीसीपी राहुल मदने यांनी सांगितले की, एसआयडीने दिलेल्या माहितीनंतर सुरक्षेतवाढ करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी सिपिडीच्या दोन टीम, स्टेट पोलीस, लोकल पोलीस, एसपीओ अशा पद्धतीने त्यांची सुरक्षा व्यवस्था आहे. भेटीसाठी येणाऱ्यांची चौकशी-तपासणी आणि त्यांच्या नोंदी करण्यात येत आहेत.

Exit mobile version