आता परदेशात उशीरा पोहोचणार फराळ

आता परदेशात उशीरा पोहोचणार फराळ

दिवाळी म्हणजे फराळ आणि गोडाधोडाचे पदार्थ करणे हे ओघाने आलेच. परंतु सध्याच्या घडीला मात्र परदेशी तुम्ही फराळ पाठवणार असाल तर, तुमचा खिसा चांगलाच रिकामा होणार आहे. बाजारात तयार फराळ दिवाळीमध्ये विक्रीसाठी ठेवले जातात. नोकरी, व्यवसायानिमित्त ज्या कुटुंबीयांना फराळ बनविण्यासाठी वेळ मिळत नाही. असे काही जण तयार फराळाला पसंती देत असतात. मात्र यंदा कुरिअर कंपन्यांनी सुद्धा फराळ पोहोचवण्याच्या किमतीमध्ये चांगलीच वाढ केलेली आहे. याआधी एक किलोचा फराळ पोहोचवण्यासाठी किमान एक हजार रुपये लागायचे आता त्याच फराळासाठी १५०० रुपये मोजावे लागत आहेत.

कोरोनामुळे विमानकंपन्यांना खूप नुकसान सोसावे लागलेले आहे. त्याच अनुषंगाने आता परदेशातील भारतीयांपर्यंत दिवाळीचा फराळ पोहोचविताना अडचणी येत आहेत. त्यामुळेयंदा अनेकांना हा फराळ उशीरा पोहोचण्याची दाट शक्यता आता निर्माण झालेली आहे. कोरोनामुळे मालवाहतूक करणारी विमाने कमी झालेली आहेत. त्यातच सध्याच्या घडीला दर आठवड्याला सिंगापूरला दोन, दुबईला दोन आणि अमेरिकेमध्ये चार इतकीच विमाने असल्याची माहिती मिळत आहे.

हे ही वाचा:

१ जानेवारीला १८ वर्षे पूर्ण होत आहेत, मग हे करा

अवघ्या ४६व्या वर्षी पुनीत राजकुमारचे निधन

उद्धव ठाकरे, शरद पवार आणि वानखेडे… काय आहे प्रकरण?

उत्तरप्रदेशात या सात पक्षांची भाजपाला साथ

दिवाळीचा हंगाम असल्याने, कुरियर यंत्रणेवर सुद्धा मोठा ताण आहे. त्यामुळे अनेकांना आता परदेशात भारतातून फराळ उशीरा पोहोचणार आहे. शिवाय कुरियर कंपन्यांनी आपल्या शूल्कामध्ये जवळपास २० ते २५ टक्के वाढ केलेली आहे. लॉकडाऊनमुळे सामानाचा तुटवडा निर्माण झालेला होता. त्यामुळे महागाई काही प्रमाणात वाढली आहे. मध्यंतरी अनेक दुकानांमध्ये सामानाचा तुटवडा भासत असल्याने, या फराळासाठी लागणारे साहित्य (कच्चा माल ) किंमत वाढल्याने त्याचाच परिणाम फराळाच्या किमतींवर पाहावयास मिळत आहे. म्हणून सर्व फराळांच्या किमती १०० ते दिडशे रूपयांनी वाढल्या आहेत.

Exit mobile version