24.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

आयकर खात्याची नाशिकमध्ये धाड; सापडली ३,३३३ कोटींची बेहिशोबी मालमत्ता

सहा दिवस कारवाई,१५ ठिकाणी छापेमारी

Google News Follow

Related

नाशिक शहरामध्ये प्राप्तिकर विभागाने २०० पेक्षा जास्त अधिकाऱ्यांच्या मदतीने छापेमारीची मोठी कारवाई करण्यात आली. गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेली कारवाई मंगळवारी संपली. नाशिकमध्ये प्राप्तिकर विभागाने १५ ठिकाणी मारलेल्या छाप्यांमध्ये जवळपास ३ हजार ३३३ कोटींचे बेहिशेबी मालमत्तेचे व्यवहार उघडकीस आले आहेत. त्याच बरोबर साडेपाच कोटींची रोकड व दागिनेही जप्त करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या छापेमारीमध्ये प्रामुख्याने नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक रडारवर होते. राज्यात प्राप्तिकर विभागाने केलेली ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राप्तिकर विभागाने २० एप्रिल रोजी पहाटे सहा वाजता सुरु केलेली ही कारवाई २५ एप्रिलपर्यंत चालली. या सहा दिवसांमध्ये नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे आणि मुंबई येथील जवळपास २२५ अधिकाऱ्यांच्या पथकाने बांधकाम व्यावसायिकांच्या ४० ते ४५ कार्यालये, बंगले, फार्म हाऊस ठिकाणी छापे टाकले.

राज्यातील बडे अधिकारी, व्यापारी आणि राजकीय नेते यांची यामध्ये गुंतवणूक यामध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. शहरामध्ये अनेक व्यावसायिकांचे प्रकल्प सुरु आहेत. या व्यवहारांमध्ये अतिशय कमी उलाढाल दाखवून करचुकवेगिरी केली असल्याचा संशय प्राप्तिकर अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे प्राप्तिकर अधिकाऱ्यांनी टाकलेल्या धाडीमध्ये मोठे घबाड लागण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

हे ही वाचा:

पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल कालवश

गौतमीचा हल्लागुल्ला अजितदादांचा सल्ला

गोळीबार करत हॉटेल व्यवसायिकाला पळवले, सात जण अटकेत

एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री असतील, त्यांच्याच नेतृत्वात निवडणुका लढवू

प्राप्तिकर विभागाने गेल्या सहा दिवसांमध्ये बांधकाम व्यावसायिकांची कार्यालये, निवासस्थाने आणि इतर ठिकाणी झाडाझडती घेतली. या कारवाईनंतर शहरात एकच खळबळ उडाली होती. प्राप्तिकर विभागाने केलेल्या छापेमारीची नाशिकमध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल ३,३३३ कोटी रुपयांचे बेहिशोबी व्यवहार उघड केल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाच्या कारवाईचा दुसरा टप्पा सुरु होणार आहे. आता ज्या लोकांनी बांधकाम व्यावसायिकांकडे गुंतवणूक केली त्यांना लक्ष करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा