नाशिकमध्ये सराफा व्यावसायिकांवर आयकर विभागाने धाड टाकून मोठी कारवाई केली आहे.आयकर विभागाने धाडीत २६ कोटींची रोकड आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त केले आहेत.सलग ३० तास आयकर विभागाने केलेल्या कारवाईत पैशाचं घबाड हाती लागलं आहे.दरम्यान,नाशिमधील सराफांकडून मोठी रोकड आणि बेहिशोबी मालमत्ता सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
आयकर विभागाच्या या कारवाईमुळे कर बुडव्यांचे धाबे दणाणले आहेत.सराफा व्यावसायिकांवर ही धाड टाकण्यात आली.सलग दुसऱ्या दिवशी पथकाने ही छापेमारी केली आहे.या कारवाईत तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.जप्त करण्यात आलेली ही २६ कोटींची रोकड मोजण्यासाठी १४ तासांचा कालावधी लागला.जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाला एकूण सात कार बोलवाव्या लागल्या. सलग ३० तास ही कारवाई चालू होती. अजूनही कारवाई सुरु असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
‘ठाकरे’ राऊतांवर भडकले…गडकरींबद्दलच्या वक्तव्यावरून नाराजी!
राजकोट गेमिंग झोनमध्ये अग्नितांडव!
आयुष्यभर गटातटाचं राजकारण करणाऱ्या राऊतांना ‘भाजपचा परिवार’ काय कळणार!
दिल्लीतील बेबी केअर सेंटरला आग, ७ बालकांचा मृत्यू!
नाशिक, नागपूर, जळगावच्या पथकाने संयुक्त कारवाई केली आहे.५० ते ५५ अधिकाऱ्यांनी या छापेमारीत सामील असल्याची माहिती आहे.दरम्यान, नाशिमधील सराफांकडून एवढी मोठी रोकड सापडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.दरम्यान, अद्याप आयकर विभागाकडून अधिकृत अशी कोणतीही माहिती आली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, पथकाने छापेमारीत २६ कोटींची रोकड आणि ९० कोटी रुपयांच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत.यामध्ये वाढ देखील होऊ शकते.