नांदेडमध्ये आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये सुमारे १७० कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.नाशिक शहरामधील भंडारी फायनान्स यांच्या घरी, कार्यालयावर आयकर विभागाने शुक्रवारी (१० मे) छापा टाकला होता.या छाप्यात जप्त केलेल्या संपत्तीची माहिती आता समोर आली आहे.सोने, दागिने, रोकड अशी एकूण १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आयकर पथकाने जप्त केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने जप्त केलेल्या मालमत्तेत १४ कोटींची रोकड आणि ८ किलोचे सोन्याचे दागिने आहेत.रोकड मोठ्या प्रमाणात असल्यामुळे रक्कम मोजण्यासाठी पथकाला तब्बल १४ तास लागले.या छाप्यामध्ये सुमारे १७० कोटींची बेहिशेबी मालमत्तेचे दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत.दोन दिवस ही छापेमारी सुरु असल्याची माहिती आहे.
हे ही वाचा:
घाटकोपर होर्डिंग प्रकरणात लोहमार्ग पोलीस ही तेवढेच जबाबदार
बंगलादेशची पाकिस्तानच्या दिशेने वाटचाल!
राहुल गांधींनी आपला पराजय पाहिला आहे, देशात त्यांना ४० जागाही मिळणार नाहीत!
गुवाहाटीत सापडले अल कायदाशी संबंधित दोन बांगलादेशी अतिरेकी!
नांदेड शहरातील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या कार्यालय आणि निवासस्थानी असे एकूण सात ठिकाणी आयकर विभागाने १० मे रोजी छापेमारी टाकली होती.या कारवाईत कमीतकमी आयकर विभागातील १०० अधिकारी-कर्मचारी सहभागी होते.पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणी येथील आयकर विभागाच्या पथकानी एकाच वेळी ही कारवाई केली होती.दरम्यान, या छापेमारीत आयकर पथकाला मोठं यश मिळालं आहे.तब्बल १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता पथकाने आपल्या ताब्यात घेतली आहे.येवढ्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि सोने सापडल्याने शहरात सर्वजण हादरले आहेत.आयकर विभाग याप्रकरणाचा अधिक तपास करत आहे.