आयकर पथकाची नांदेडमध्ये जोरदार कारवाई सुरु आहे.नांदेडच्या शिवाजीनगरमध्ये पाच ते सात ठिकाणी आयकर पथकाने छापे टाकले आहेत. नांदेड शहरातील संजय भंडारी या फायनान्स व्यापाऱ्यासह त्यांच्या भावाचे कार्यालय आणि निवासस्थानी हे छापे टाकण्यात आले आहेत.या कारवाईत कमीतकमी आयकर विभागातील १०० अधिकारी-कर्मचारी सहभागी आहेत.
शहरात अचानक झालेल्या छापेमारीमुळे एकच खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरातील शिवाजीनगर येथील भंडारी फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडच्या दोन कार्यालयावर छापा टाकण्यात आला आहे. तसेच कोठारी कॉम्प्लेक्स मधील कार्यालयावरही छापा टाकला गेला. तसेच आदिनाथ पतसंस्था, पारसनगर येथील संजय भंडारी आणि त्यांच्या भावाच्या निवासस्थानी छापे टाकण्यात आले आहेत.
हे ही वाचा:
“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”
‘अबब! १५ कोटी रुपयांचे ड्रग्स कॅप्सूल पोटात ठेवून तस्करी करणारा मुंबई विमानतळावर अटक’
११ वर्षांनंतर निकाल डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाचा; तिघे निर्दोष, दोन आरोपींना जन्मठेप
‘गरज पडल्यास इस्रायल एकट्याने लढेल’
पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नांदेड आणि परभणी येथील आयकर विभागाच्या पथकानी एकाच वेळी ही कारवाई केली. दरम्यान, ही छापेमारी नेमकी कशासाठी केली जात आहे. यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही आहे.