नांदेडमधील सरकारी हॉस्पिटलमध्ये एका दिवसात २४ जणांचा मृत्यू झाला. यानंतर महाराष्ट्रभर संताप पाहायला मिळाला.या प्रकरणी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी या घटनेबाबत अहवाल मागितला होता.या घटनेचा पहिला अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले आहे.नांदेडमधील सरकारी हॉस्पिटलची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार नांदेडमध्ये आल्या होत्या तेव्हा त्यांनी प्रतिक्रिया दिली.
नांदेड मधील शासकीय रुग्णालयात रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर शासनाकडून एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे, असे मंत्री तसेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते.ही समिती दोन ते तीन दिवसात संपूर्ण घटनेचा अहवाल सादर करेल. त्यानंतर या घटनेला जे कोणी जबाबदार असतील त्या दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे, मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले होते.केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी देखील घटनेची दखल घेत घटनेचा अहवाल मागविला होता.आज त्या नांदेड मधील शासकीय रुग्णालयाला भेट देत चौकशी केली.
त्या म्हणाल्या, नांदेडच्या रुग्णालयात घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे.या दुर्दैवी घटनेबाबत अहवाल मागितला आहे.
या रूग्णांच्या मृत्यूबाबत प्राथमिक अहवाल आला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, यासाठी समिती नेमली आहे चौकशी सुरू आहे. जे रुग्ण होते त्यात काहींचं वय जास्त होतं. तर काही खाजगी हॉस्पिटलमधून रुग्ण आले होते. तिथं औषधसाठा पुरेसा होता. या संदर्भात लवकरच अहवाल येईल, असं भारती पवार म्हणाल्या.
हे ही वाचा:
काश्मीर आणि अरुणाचल प्रदेशला भारतापासून वेगळे दाखवण्यासाठी रेटला अजेंडा
हळद निर्यातीत १०० कोटी डॉलरचे लक्ष्य गाठण्यासाठी हळद मंडळाची स्थापना
नांदेडमधील शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यू प्रकरणाचा अहवाल केंद्र सरकारला प्राप्त झाल्याचे,मंत्री भारती पवार यांनी सांगितले.औषधांचा साठा पुरेसा होता. औषधं नसल्याने मृत्यू झाले नाहीत. मृत्यू झालेल्या काही रुग्णांचं वय जास्त होतं. अनेक रुग्ण खाजगी रुग्णालयातून इकडे भरती झाले होते. काही नवजात बालक खाजगीत व्हेंटिलेटरवर होती. ते शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्राप्त झालेल्या अहवालात प्राथमिक माहिती आहे. या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी उच्च स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. दुसरा सविस्तर अहवाल लवकरच येईल, असं भारती पवार यांनी सांगितलं.
मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये भेट दिली. तिथली परिस्थिती जाणून घेतली. सुविधा मिळतात की नाही, हे पाहिलं. ५०० बेडचं हे हॉस्पिटल आहे. औषधं आहे की नाही याबाबत माहिती घेतली. औषध नसतील तर मागणी करा, असं सांगितलं. केंद्र सरकार कडून औषध दिलं जात आहेत की नाही याचा आढावा घेतल्याचे त्यांनी सांगितले.