आप समर्थक बॉलिवूड संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी यांनी अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार कंगना रनौटला मारहाण करणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबलला नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे देशभरातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
चंडिगड विमानतळावर अभिनेत्री व नवनिर्वाचित खासदार कंगना राणावतवर हल्ला करणाऱ्या सीआयएसएफ कॉन्स्टेबल कुलविंदर कौरला दादलानी याने नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. इन्स्टाग्रामवरील त्यांच्या या पोस्टवर अनेक जणांनी तीव्र नाराजी दर्शवली आहे. ‘जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या कानशिलात लगावली आणि नंतर कंगना राणावतच्या कार्यालयात नोकरी मिळवली किंवा त्याच्या शेरेबाजीने किंवा गाण्यामुळे जे दुखावले गेले असतील आणि त्यांनी त्याच्या कानशिलात लगावली असेल तर ते योग्य ठरेल का,’ असे प्रश्न अनेकांनी विचारले आहे.
हे ही वाचा:
जम्मू काश्मीरमध्ये आयएसआय, दहशतवाद्यांची कामे करत होते सरकारी कर्मचारी!
‘पवन कल्याण’ ठरले आंध्रच्या निवडणुकीतले वादळ
ऑस्ट्रेलियाकडून इंग्लंडचा ३६ धावांनी पराभव
महाराष्ट्रात भाजपला पराभूत करण्यासाठी मुस्लिमांची एकजूट
विशाल दादलानी याने यापूर्वी अनेकदा हिंसक कृत्यांना प्रोत्साहन दिले आहे. अनेक ‘एक्स’ यूजरने दादलानी याचे जुने ट्विट शेअर केले आहेत, ज्यात तो (अधिकाऱ्यांना) सध्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप नेत्यांना गोळ्या घालण्यास सांगत आहे. त्यामुळे काही व्यक्तींनी त्याचे हे जुने ट्विट शेअर करून, त्यांनी उत्तर प्रदेश पोलिसांना टॅग केले आहे आणि योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजप नेत्यांना शारीरिक इजा पोहोचवण्याबद्दल विधान करणाऱ्या वादग्रस्त संगीत दिग्दर्शकावर कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले आहे.
गायिका सोना मोहपात्रा हिनेही विशाल दादलानी याच्या दुटप्पीपणाबद्दल निंदा केली आहे. ‘दादलानीने कथित विनयभंग करणारा अनु मलिक यांच्या विरोधात भूमिका घेण्याचे टाळले होते आणि मला खूप पैसे जमवायचे आहेत आणि भारत सोडायचा आहे, असे म्हटले होते. ‘अनू मलिक सारख्या अनेकींचा विनयभंग करणाऱ्यासोबत हे परीक्षक म्हणून बसतात आणि जेव्हा माझ्यासारखे सहकारी विनयभंगाविरोधात उभे राहण्यासाठी, बोलण्यासाठी, रिॲलिटी शोच्या या विषारी संस्कृतीविरोधात जेव्हा आवाज उठवतात. तेव्हा हे पैशांच्या गोष्टी करतात. खूप पैसा कमवून, देशातून बाहेर पडायचे आहे, असे सांगतात,’ असे या गायिकेने नमूद करून दादलानी याचा दुटप्पीपणा जगासमोर मांडला आहे.